Goa Murder Case: अन्नावरुन झालेल्या वादात पणजीत कामगाराचा खून; लखनऊच्या तिवारीला दोन तासांत अटक

Goa Crime News: धारदार हत्याराने त्याने जॉनचा गळ्यावर वार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
Goa Murder Case: अन्नावरुन झालेल्या वादात पणजीत कामगाराचा खून; लखनऊच्या तिवारीला दोन तासांत अटक
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अन्नावरुन झालेल्या वादात कन्सट्रक्शन इमारतीवरील कामगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला पणजी पोलिसांनी दोन तासांत अटक केलीय. भाटले येथील राम मंदिराजवळ सोमावारी (०९ डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

जॉन (पूर्ण नाव समोर आलेले नाही) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदार नाजीर मुल्ला (वय ४५, रा. सांतिनेज, पणजी) यांनी पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासून संशयित अरविंद तिवारी (वय ३८, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) याला अटक केली.

Goa Murder Case: अन्नावरुन झालेल्या वादात पणजीत कामगाराचा खून; लखनऊच्या तिवारीला दोन तासांत अटक
Devendra Fadanvis In Goa: अधिवेशन उरकून देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, रात्रीत उरकणार दौरा, कारण काय?

तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावून संशयित आरोपीला अटक केली. संशयित तिवारी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिवारीला पणजी येथील योग सेतू जवळून अटक करण्यात आली.

Goa Murder Case: अन्नावरुन झालेल्या वादात पणजीत कामगाराचा खून; लखनऊच्या तिवारीला दोन तासांत अटक
Sunburn Festival: ‘सनबर्न’विरोधात तिसरी याचिका दाखल! सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नावरुन झालेल्या किरकोळ वादातून अरविंद तिवारी याने कामगार जॉनचा खून केला. धारदार हत्याराने त्याने जॉनचा गळ्यावर वार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com