Devendra Fadanvis In Goa: अधिवेशन उरकून देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, रात्रीत उरकणार दौरा, कारण काय?

Devendra Fadanvis In Goa: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच गोव्यात दाखल झाले आहेत.
Devendra Fadanvis In Goa: अधिवेशन उरकून देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, रात्रीत उरकरणार दौरा, कारण काय?
Devendra Fadanvis In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दोन दिवसांचे विशेष अधिवेशन उरकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (०९ डिसेंबर) उशीरा रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. दक्षिणेतील दाबोळी विमानतळावर फडणवीसांचे गोव्याचे राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्वागत केले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच गोव्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय देखील उपस्थित होते. मॉविन यांनी दाबोळी विमानतळावर फडणवीसांची गळाभेट घेऊन पुष्पगुच्छ दिले. महाराष्ट्र विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशाबाबत मॉविन यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. विमानतळावरुन फडणवीस आणि मंत्री विजयवर्गीय पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

Devendra Fadanvis In Goa: अधिवेशन उरकून देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, रात्रीत उरकरणार दौरा, कारण काय?
सेक्स्टॉर्शन नव्हे रॅकेट! भाजप आक्रमक, काँग्रेस आमदार कार्लस फेरेरा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, गोव्यातून कार्यक्रम उरकून उशीरा रात्री फडणवीस माघारी मुंबईला जाणार असल्याची माहिती समोर मिळाली आहे. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन उरकून फडणवीस अचानक गोव्यात दाखल झाल्याने विविध तर्क लावले जात आहेत. मात्र, त्यांच्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.

Devendra Fadanvis In Goa: अधिवेशन उरकून देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, रात्रीत उरकरणार दौरा, कारण काय?
Sattari: 15 गावांना मिळणार शुद्ध पाणी; सत्तरीत वेलनेस डेस्टिनेशन सेंटर, इको कॉटेज & जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्गाटन

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर ०५ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ०८ आणि ०९ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे विशेष अधिवेशन पार पडले. यात राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली. तसेच, या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा देखील शपथविधी पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com