Goa Mining: खनिज वाहतुकीवरून दोन गटात वाद; कुडचडे येथे ट्रक अडविले

ट्रकमालकांना फटका
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining: खनिज व्यवसाय बंद झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ट्रक मालकांनी हा व्यवसाय सुरू झाला पाहिजे, अशी मागणी करून अनेक आंदोलने केली होती. सध्या ई-लिलाव झालेल्या खनिज मालाची वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असून काही ठिकाणी अंतर्गत राजकारणावरून दोन गट निर्माण झाले आहेत.

त्याचा फटका ट्रक मालकांना बसू लागला आहे. आज खामामळ कुडचडे येथील मॅग्नम जेटीवर खनिज माल खाली करण्यावरून गावात दोन गट तयार झाल्याने आज या जेटीवर खनिज खाली करण्यासाठी आलेले ट्रक एका गटाने अडवून धरल्याने संध्याकाळपर्यंत खनिजाने भरलेले ट्रक रस्त्यावर उभे होते.

Goa Mining
Ponda Lok Sabha election : लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

गेल्या एक महिन्यांपूर्वी सदर जेटीवर खनिज माल खाली करण्यावरून खामामळ गावात कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याबरोबर ट्रक मालकांची बैठक झाली होती व यावेळी काब्राल यांच्या विरोधकांनी एक लाख टन खनिज असेल तरच येथे खनिज खाली करू देणार असल्याचे काब्राल यांना सांगितले होते.

जर या गावातील ट्रक मालकांना चांगले काम मिळत नसेल तर थोड्या थोड्या खनिज मालाची या ठिकाणी वाहतूक करू देणार नसल्याचे सांगितले होते.

आज कुणाल फळदेसाई या कॉन्ट्रॅक्टरने खामामळ येथे खनिज माल खाली करण्यासाठी आपले ट्रक जेटीवर पाठविले असता काब्राल यांच्या गटाने सदर वाहतूक अडवून धरली व या जेटीवर किती लाख टन माल आणला जाणार असा प्रश्न नगरसेवक प्रसन्ना भेंडे यांनी उपस्थित केला.

Goa Mining
Mount Everest climber: 13 वर्षीय शनाया वेर्लेकरने केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर

या वेळी मेग्नम कंपनीचे अधिकारी उत्तर देण्यासाठी कोणीच उपस्थित न राहिल्याने आम्ही ही वाहतूक सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

खामामळ येथील या जेटीवर खनिज वाहतुकीवरून काब्राल गट व विरोधक असे दोन गट तयार झाले असून या दोन्ही गटांमध्ये खनिज वाहतुकीवरून उभी फूट पडली आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीवेळी ही फूट दिसून आली होती.

आज विरोधी गटाने सदर वाहतूक झाली पाहिजे असे सांगितले. जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यासाठी आम्ही या वाहतुकीला पाठिंबा दिला आहे असे रायसू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com