Mount Everest climber: 13 वर्षीय शनाया वेर्लेकरने केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर

गिर्यारोहण हा एक कठीण क्रीडा प्रकार असला तरी साहस दाखविण्याची त्यात चांगली संधी असते याची जाणीव शनायाला होती.
Mount Everest climber
Mount Everest climberGomantak Digital Team
Published on
Updated on

मडगाव येथील 13 वर्षीय शनाया गौतम वेर्लेकर हिने समुद्रसपाटीपासून 5360 मीटर उंचीवर असलेला माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करून भविष्यात एक सर्वोत्कृष्ट गिर्यारोहक बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

जरी केवळ बेस कॅम्प सर केलेला असला तरी तिच्यासाठी तो अनुभव जीवन बदलणारा आहे. तिच्या आंतरिक शक्तीची अनुभूती तिला या ट्रेकमध्ये नक्कीच मिळाली असेल. एवढ्या लहान वयात हिमालयात, एवढ्या उंचीवर पोहोचताना शनायाने दाखवलेले संतुलन व तिचा दृढनिश्चय वाखाणण्यासारखा आहे.

Mount Everest climber
Blog: कामसू हात, स्वाभिमानी मान आणि प्रेमळ मन

शनाया ही मनोविकास शाळेत सातवी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी असून  ती एक उत्तम बॅडमिंटन खेळाडूदेखील आहे. आपल्या संघाबरोबर शिखराचा बेस कॅम्प गाठण्यास तिला 9 दिवस लागले. तिच्या बरोबर तिची आई करिष्मा व वडील गौतम हेदेखील होते. ट्रॅकच्या दरम्यान त्या दोघांनीही आपल्या मुलीचा आत्मविश्वास सतत जागवत ठेवला. बेस कॅम्पवरून खाली उतरण्यास त्यांना 4 दिवस लागले. शनायाच्या कामगिरीमुळे गोव्यातील युवा गिर्यारोहकांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल.

गिर्यारोहण हा एक कठीण क्रीडा प्रकार असला तरी साहस दाखविण्याची त्यात चांगली संधी असते याची जाणीव शनायाला होती. तिची आई करिष्मा या पूर्वी बेस कॅम्पवर जाऊन आल्याने त्या अनुभवाचाही फायदा शनायाला  झाला. ‘ही कामगिरी करताना आपल्याला पालकांचा पाठिंबा मिळाला.

Mount Everest climber
Blog: स्तुती, निंदा आणि त्यांचे प्रयोजन

माझ्या आईने माझ्यात जो आत्मविश्वास जागवला  व त्याच्या बळावर आपण ही मजल गाठू शकले’ असे शनाया म्हणते. ‘मी बॅडमिंटन खेळाडू असल्याने व प्रशिक्षक शर्मद महाजन यांच्याकडून मला मिळणाऱ्या  पौष्टिक आहार व आरोग्यदायी  जीवनशैलीच्या  धड्यांमुळे तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी मी करत असलेल्या जिममधील नियमित व्यायामामुळे ह्या उंचीपर्यंत पोहोचताना मला मुळीच थकवा जाणवला नाही’ असेही शनाया म्हणाली. 

बेस कॅम्पकडे कूच करताना कुटुंबातील सर्वांच्या पाठिंब्यामुळे शनायाच्या मनावर कसलेही दडपण नव्हते. तिला आव्हाने स्वीकारणे व ती पूर्ण करून दाखविणे आवडते. अर्थात सर्वप्रथम तिला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे व त्या बरोबरीने आवडते छंद पूर्ण करायचे आहेत. पहाडांची शिखरे गाठणे हे एक आव्हानच  असते.

Mount Everest climber
Blog: सोयीने नव्हे तर आवडीने...

पुढील लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्याआधी तिला सर्वोत्तम महिला व पुरूष गिर्यारोहकांनी पार केलेली आव्हाने व त्यांचे यश जाणून घ्यायचे आहे. गिर्यारोहण हा एक साहस-खेळ आहे. ज्यांना या क्रीडा प्रकारात सहभागी व्हायचे आहे त्यानी माउंटनियरिंग  आणि साहस-क्रीडा संघटनामध्ये सामील व्हावे व तिथून प्रशिक्षण घ्यावे असे शनायाचे मत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com