Transgender
TransgenderTwitter/ ANI

गोव्यात 7 ट्रान्सजेंडरना मिळाले मतदार कार्ड, 40 वर्षांचा ट्रान्सजेंडर म्हणाला...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात (Goa) आज सात ट्रान्सजेंडर मतदारांना मतदान कार्ड देण्यात आले आहे.
Published on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आज सात ट्रान्सजेंडर मतदारांना मतदान कार्ड देण्यात आले आहे. या प्रकरणी गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी मंगळवारी सांगितले की, आम्ही यंदाच्या निवडणुकीत ट्रान्सजेंडरना (Transgender) नामांकित करण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी आम्ही अनेक गैर-सरकारी संस्थांची (NGO) मदत घेत आहोत. (7 Transgender People Get Voter Cards In Goa Today)

दरम्यान, मतदान प्राधिकरणाने आज आयोजित केलेल्या पहिल्या आउटरीच कार्यक्रमात गोव्यातील सात ट्रान्सजेंडर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येकाला मतदार कार्ड देण्यात आले. दरम्यान एका 40 वर्षीय ट्रान्सजेंडरने सांगितले की, ''मतदार ओळखपत्र मिळाल्यानंतर मला असे वाटते की, मी आज 18 वर्षांचा झालो. आता माझ्याकडे एक नवीन ओळख आहे. आणि माझे नवीन ओळखपत्र हे दर्शवते.'' 14 फेब्रुवारी रोजी गोव्यातील 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Transgender
Goa Assembly Election 2022: बाबू अन् बाबा मडगावात दुसऱ्यांदा आमने सामने

काँग्रेसचे माजी नेते जोसेफ सिक्वेरा यांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात काँग्रेसला (Congress) जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी नेते जोसेफ सिक्वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. कळंगुटमधून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, जर पक्षाने मला तिकीट दिले तर मी माझी सर्व शक्ती पणाला लावेन.

विधानसभा निवडणुक आम्ही जिंकत आहोत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) म्हणाले की, कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा (Joseph Sequeira) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कळंगुटमध्ये आम्ही आमचा पक्ष पुन्हा बळकट केला असून गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही निश्चितपणे जिंकत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com