तुल्यबळ लढतींसाठी भाजपची व्यूहरचना

मुख्यमंत्री सक्रिय : बंडखोरांशी चर्चा, 'शेरास सव्वाशेर'ची नीती
BJP in Goa
BJP in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भारतीय जनता पक्षाला खात्रीच्या मतदारसंघात सक्षम उमेदवारांची फळी उभी करण्यात यश आल्याचे आज स्पष्ट झाले. रिंगणात उतरण्यास नकार देणाऱ्यांना लढ्यासाठी राजी करण्यापासून तिकीट नाकारलेल्यांची समजूत घालून त्यांना संघटनेत सक्रीय करण्यापर्यंत मुत्सद्देगिरीच्या आधाराने पक्षाने प्रतिकाराची धार बोथट करण्याच्या कामाला आता प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री लागले आहेत. (BJP Planning for Goa Elections News Updates)

BJP in Goa
जनता मुख्यमंत्र्यांना घरी बसविण्यास सज्ज : सगलानी

मायकल लोबो (Michael Lobo) यांच्या जाण्याने रिक्त पडलेल्या कळंगुट मतदारसंघातून तुल्यबळ अशा जोसेफ सिक्वेरांना भाजपने उमेदवारी दिल्यात जमा आहे. सिक्वेरा हे कळंगुटचे माजी सरपंच आणि लोबो यांचे कट्टर विरोधक. गेल्या निवडणुकीत त्यांच्यावर लोबो यांनी मात केली होती. त्यांच्या प्रवेशामुळे लोबो यांच्यासमोरच्या आव्हानाला प्रबळ स्वरुप आले आहेच. शिवाय शेजारच्या शिवोली मतदारसंघात हस्तक्षेप करतानाही आता त्यांना पिछाडी उघडी पडणार नाही, याची काळजी वाहावी लागणार आहे. एका परीने लोबोंना कळंगुटमध्येच बांधून ठेवण्यात भाजप यशस्वी झाला आहे.

BJP in Goa
TMC Third Candidate List: 'तृणमूल'ची तिसरी उमेदवार यादी जाहीर

आपल्या पारंपरिक धारणेशी तडजोड करत पक्षाने दोन ठिकाणी पती-पत्नीला उमेदवारी दिली असली तरी त्यातून चारही मतदारसंघ पक्षाच्या पदरात पडतील अशी खात्री भाजपच्या (BJP) एका नेत्याने या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. मात्र, पक्षाने काही माजी मंत्र्यांसह आमदारानांही तिकीट नाकारले असल्याकडे लक्ष वेधत राजकीय कर्तृत्व हाच उमेदवार निवडीचा निकष राहिल्याचे हा नेता म्हणाला. सक्षम उमेदवारांना झुकते माप देतानाच कुणी पक्षावर कुरघोडी करण्याच्या स्थितीत येणार नाही, याची काळजी दिल्लीतील नेत्यांनी घेतल्याचे त्याने सांगितले.

BJP in Goa
कळंगुटमधून सिक्वेरा भाजपाचे उमेदवार, तृणमूल काँग्रेसला राजीनामा

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar), लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नाराजीतून पुढे जाण्याची रणनिती भाजप कार्यवाहीत आणत असल्याचे दिसते. पक्षापासून दुरावलेल्या बिनीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याच्या प्रयत्नात नेतेमंडळी आहेत. अन्य मतदारसंघांतही रुसलेल्यांना पुन्हा प्रचारकार्यात गुंतवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून माजी मंत्री दिलीप परुळेकर यांचे उदाहरण बोलके मानले जाते. बंडखोरांनी माघार घ्यावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे आणि त्याचवेळी त्यांच्या प्रभावळीतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवायचे, असे धोरण पुढील सप्ताहभरात राबवले जाणार असल्याची माहिती पक्षातील एका नेत्याने दिली.

मडगाव मतदारसंघातून बाबू आजगावकर यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णयही पक्षाला लाभदायी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची भिस्त असलेल्या स्थलांतरितांच्या मतपेढीशी बाबूंची असलेली जवळीक पक्षाला नवे मतदार मिळवून देतील असा विश्वास मडगावातील कार्यकर्त्यांना आहे. अनेक वर्षांनंतर भाजप मडगावात आक्रमक होत असल्याची दिसत आहे.

BJP in Goa
Goa BJP: उत्पल यांनी पुन्हा भाजपत यावं

राजकीय वजन आणि क्रयशक्ती याबाबतीत मातब्बर उमेदवार देत बहुतेक मतदारसंघांत आपण स्पर्धेत आणि चर्चेत राहू याची खबरदारी पक्षाने घेतली आहे. सासष्टीतील ख्रिस्तीबहुत मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघातले भाजपचे उमेदवार, मग ते मूळ भाजपचे असोत वा अन्य पक्षांतून आलेले, ते तुल्यबळ मानले जातात. ख्रिस्तीबहुल मतदारसंघातली आपली मते आपल्याला मिळतील, ती अन्य पक्षांकडे जाणार नाहीत याची काळजी घेत पक्षाने उमेदवार दिलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com