साखळीत आज दिंडी महोत्सव

सारेगमप लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायन यांचा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा मराठी गाण्यांच्या कार्यक्रम होणार
दिंडी महोत्सव
दिंडी महोत्सवDainik Gomantak

साखळी: साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कला व संस्कृती संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी बाजार (जुने बसस्थानक) येथे रविवार, 6 मार्च रोजी संध्याकाळी 4 वा. अखिल गोवा निमंत्रित दिंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. सायंकाळी 7 वा. सारेगमप लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायन यांचा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा मराठी गाण्यांच्या कार्यक्रम होणार आहे.

साखळी येथील ओंकार भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत साखळी गणेशोत्सव मंडळाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष शैलेंद्र काणेकर यांनी ही माहिती दिली.

दिंडी महोत्सव
बाणावलीमध्ये जिंकुन येण्याचा चर्चिल यांनी व्यक्त केला विश्वास

यावेळी गजानन नार्वेकर, कुष्टा सातार्डेकर, उपेंद्र कर्पे, आनंद काणेकर, विनय पांगम, विनायक शेट्ये, सुदेश काणेकर, धीरेश पेडणेकर, चंद्रशेखर देसाई, मोरेश्वर कुंभार आणि केंद्रीय समिती सदस्य उपस्थित होते. दिंडी महोत्सव संध्या. 4 वा. गोकुळवाडी-साखळी येथे राधाकृष्ण मंदिरापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजीराजे चौक, कदंब बसस्थानक ते बाजारात (जुने बसस्थानक) आल्यानंतर तेथे दिंडी पथकांचे परीक्षण करून लगेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. नंतर संगीत मैफल होईल. यासाठी साथी कलाकार म्हणून हार्मोनियमवर धनराज मडकईकर, तबला साथ रोहित बांदोडकर, कि बोर्ड विष्णू शिरोडकर, पखवाज अवधूत च्यारी, ऑक्टोपॅड प्रकाश आमोणकर तर निवेदिका मानसी वाळवे आहेत.

दिंडी महोत्सव
खांडेपार येथे ट्रक-टेंम्पो अपघात; चालक जखमी

कार्यकारिणी मंडळ

दिंडी समिती - गजानन नार्वेकर, प्रियेश डांगी, विनायक शेट्ये, शाणू वळवईकर, परेश साखळकर. बक्षीस वितरण समिती- आनंद काणेकर, चंद्रशेखर देसाई, मोरेश्वर कुंभार, विनय पांगम. कार्यक्रम समिती - शैलेंद्र काणेकर, गजानन नार्वेकर, उपेंद्र कर्पे, महेश नाईक व शंभू घाडी. अल्पोपहार समिती - सुदेश काणेकर, संतोष हळदणकर, निखिल मेरकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com