मडगावच्या धोकादायक पदपथांना रेलिंग घालण्याची सूचना

हॉटमिक्सचा थर वाढल्याने पदपथ आले रस्त्याच्या बरोबरीला, दिगंबर कामतांकडून पाहणी
Digambar Kamat Inspecting Footpath
Digambar Kamat Inspecting FootpathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : हॉस्पिसियो हॉस्पिटल ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यानच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करताना पूर्वीचा डांबराचा थर काढून न टाकल्याने रस्त्याची उंची काही ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जे पदपथ बांधले होते त्यांच्या बरोबरीने आल्याने हे पदपथ चालण्यासाठी धोक्याचे बनले असून त्यावर उपाय म्हणून अशा सर्व पदपथाना आता रेलिंग घालून लोकांना सुरक्षा देण्याचा उपाय घेण्यात आला आहे.

Digambar Kamat Inspecting Footpath
Goa Road: 'पावसाळ्यापूर्वी सर्व्हिस रोड पूर्ण करा'

मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्याबरोबर या रस्त्याची पाहणी केली. या पदपथावर सुरक्षा रेलिंग न बसविल्यास गाड्या पदपथावर चढून अपघात होऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Digambar Kamat Inspecting Footpath
वीज सूट घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिलला

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना कामत यांनी सूचना करताना, यापुढे मडगावमध्ये (Madgaon) असे हॉटमिक्स डांबरीकरण करताना रस्त्यावरील (Road) जुन्या डांबराचा थर खरवडून काढून नंतरच हॉटमिक्स त्यावर घालावे असे सांगितले. आपण तशी लेखी सूचना खात्याला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com