वीज सूट घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिलला

मंत्री मॉविन गुदिन्हो यांना सुनावणीस अनुपस्थित राहण्याची कोर्टाची परवानगी
Minister mauvin godinho News, GST Rate News
Minister mauvin godinho News, GST Rate News Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यावरील 4.52 कोटी रुपयांच्या वीज सूट घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवार 12 एप्रिल रोजी होणार आहे. मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विन्सेंट डिसिल्वा यांनी गुरुवारी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि पुढील सुनावणीच्या वेळी पाच साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्याचा आदेशही दिला आहे.

Minister mauvin godinho News, GST Rate News
सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पालकांना सतावू नका: गुदिन्हो

माजी वीजमंत्री आणि सध्याचे वाहतूक आणि पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या विरोधातील हे कथित वीज सूट घोटाळा (Fraud) प्रकरणी सुनावणी सध्या न्यायालयात चालू आहे. तब्बल 24 वर्षांनी या खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांना मात्र न्यायालयाने न्यायालयात अनुपस्थित राहण्याची सूट दिली आहे.

Minister mauvin godinho News, GST Rate News
Power Scam Hearing : गुदिन्हो यांना सुनावणीस गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी

गुरुवारी या खटल्याच्या सुनावणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ज्या दोन कंपन्यांचा या कथित घोटाळा खटल्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यांच्यावतीने कोण हजर राहील या बद्दलचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. या खटल्यात एकूण सहा जणांचा समावेश आहे.

1998 साली गुदिन्हो वीजमंत्री असताना काही कंपन्यांना बेकायदेशीररित्या वीज बिलात माफी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मंत्र्यांबरोबर त्यावेळचे मुख्य वीज अभियंते, दोन कंपन्या आणि अन्य चार जणांवर फसवणूक करणे आणि भ्रष्टाचार (Corruption) करण्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले होते. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर 24 वर्षांनी ही सुनावणी सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
Sewage Water In Colva Creek
Goa Assembly Election 2027 updates
Tiger Death In Goa 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com