यावर्षी तब्बल 980 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई..! राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभाग ॲक्शन मोडमध्ये

चालकांचे परवानेही रद्द करण्यात येणार; वाहतूक विभागाचे अधीक्षक अक्षत कौशल यांची माहिती
Goa Accident cases
Goa Accident cases Dainik Gomantak

Goa Traffic Police is in Action mode to prevent drink and drive cases

2023 सुरू झाल्यापासूनच राज्यात अपघातांची मालिकाही सुरू झाली आहे. यामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या वर्षाने वाहतूक पोलिसांना चांगलेच कामाला लावले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

यासाठी दिवसा आणि रात्रीही राज्यभरात ठीकठिकाणी वाहतूक पोलीस पथके तैनात राहून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल करू लागले. मात्र ही कारवाई काही दिवसानंतर थांबल्यावर पुन्हा वाहनचालक नियम मोडताना दिसून येतात.

राज्यात घडणाऱ्या अपघातांमध्ये अतिवेगासोबतच मद्य पिऊन वाहन चालवणे हे एक प्रमुख कारण असल्याचे विभागाने सांगितले आहे. 10 पैकी 8 घटना या 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' च्या असल्याचे समोर आले आहे.

2023 मध्ये 980 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई..!

2022 मध्ये एकूण 795 मद्यधुंद वाहनचालकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती. मात्र यावर्षी हा आकडा वाढला असून तब्बल 980 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

आधी असे अपघात फक्त रात्रीच्या वेळी होत असत. मात्र आता दिवसासुद्धा अनेक वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.

मागील काही महिन्यांमध्ये गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे दारू पिऊन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक गोव्यातील कायद्यांना आणि पोलिसांना जुमानत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. (Goa Drink and Drive Cases)

काही दिवसांपूर्वी बाणस्तारीमध्ये झालेल्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले. ही घटना ताजी असतानाच काल पर्वरीमध्ये एका कारचा जीवघेणा अपघात झाला, ज्यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

कार अतिवेगात असल्यामुळे हा अपघात घडला असून, चालकाने मद्य प्राशन केले असल्याचे बोलले जात आहे.

या घटनांमुळे राज्यातील तसेच राज्याबाहेरून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येते.

दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रामुख्याने मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा चालकांचे परवानेही रद्द करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com