Mumbai Goa Highway Accident: ट्रीपनंतर रेस्टॉरंट शोधत असताना मुंबई गोवा महामार्गावर अपघात; 28 वर्षीय तरुणी ठार, दोघे जखमी

Mumbai Goa Highway: पक्षी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर तिघेजण रेस्टॉरंटच्या शोधात निघाले होते. यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
Mumbai Goa highway crash kills 28-year-old woman
Mumbai Goa Highway Accident
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: मुंबई - गोवा महामार्गावर अपघाताची घटना समोर आली आहे. विरुद्ध कारने धडक दिल्याने दुचाकीवरील २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. कर्नाळा पक्षी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर दुचाकीवरुन रेस्टॉरंट शोधत असताना मुंबई - गोवा उड्डाणपुलावर रविवारी (०६ एप्रिल) दुपारी हा अपघात झाला.

अदिती सिंग (वय २८, रा. विलेपार्ले) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, सलमान शहा (वय २७) आणि गौरी खैरनार (वय १०) असे या अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांची नावे आहेत. तिघेजण कर्नाळा पक्षी संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Goa highway crash kills 28-year-old woman
Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीला कोणती दिसतात लक्षणे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय अन् डॉक्टरांचा सल्ला घ्या

पक्षी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर तिघेजण रेस्टॉरंटच्या शोधात निघाले होते. दरम्यान, यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अदितीचा मृत्यू झाला असून, इतर दोघे जखमी झाले आहेत. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून दुचाकीला धडकली, अशी माहिती समोर आली आहे.

अदिती सिंगला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर जखमी दोघांना सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने त्यांना बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Mumbai Goa highway crash kills 28-year-old woman
Goa Illegal Constructions: "गोवेकर कोण हे ठरवा, गोवेकरांचीच घरं वाचवा" मनोज परब यांचा पंचायत मंत्र्यांवर थेट हल्लाबोल

पोलिसांनी कार चालक हर्षद जैन (३१) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. जैन हा व्यवसायने एलआयसी एजंट असून, तो मुंबईच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच स्वत:सह इतरांचे आयुष्य धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांनी जैन विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले असून, त्याला नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Goa Accident News
Sporting Club Goa Charity Cup
Nitin Gadkari ashamed Mumbai Goa Highway delay
Mumbai Sawantwadi Daily Express Train Timetable
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com