VIDEO: सुरावलीत खुलेआम रेड्यांच्या धीरयो! ‘रॉलेक्‍स’ व ‘पाकलो’ आपसांत भिडले; पोलिस मात्र अनभिज्ञ

Dhirio In Seraulim: राज्यात धीरयोंवर न्‍यायालयाने बंदी घातलेली असतानाही कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत धीरयो नियमितपणे होत आहेत. सुरावली येथे खुलेआम रेड्यांच्या धीरयो झाल्‍या.
Dhirio In Goa
Dhirio In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: राज्यात धीरयोंवर न्‍यायालयाने बंदी घातलेली असतानाही कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत धीरयो नियमितपणे होत आहेत. मंगळवारी सुरावली येथे खुलेआम रेड्यांच्या धीरयो झाल्‍या.

त्‍यात रॉलेक्‍स आणि पाकलो हे दोन रेडे एकमेकांना भिडले. ही झुंज सकाळी झाल्‍याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी यासंबंधात कोलवा पोलिस स्‍थानकाशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचा कुठलाही गुन्‍हा पोलिस स्‍थानकात नोंद नसल्याची माहिती मिळाली.

Dhirio In Goa
Dhirio In Goa: गोव्यात हे काय चाललंय? 4 ठिकाणी 'धीरयो' झाल्याची बातमी; सुरावलीत बैल उधळून एक जखमी झाल्याची चर्चा

कोलवा पोलिस स्‍थानकाचा ताबा सांभाळणारे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांना विचारले असता, सासष्‍टीच्‍या मामलेदारांकडून आम्‍हाला यासंबंधी फोन आला होता. त्‍यानंतर आम्‍ही लगेच त्‍याठिकाणी पोलिस पाठविले. मात्र, त्‍या ठिकाणी आम्‍हाला असा कुठलाही प्रकार झाल्‍याचे कुणी सांगितले नाही, असे ते म्हणाले.

Dhirio In Goa
Benaulim Dhirio: बाणावलीत 2 दिवस खुलेआम धीरयोचा थरार! बघ्यांची तोबा गर्दी; पोलिस मात्र अनभिज्ञ

मात्र, स्‍थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उघड्यावर झालेल्‍या या धीरयो पाहण्‍यासाठी शेकडो लोक जमा झाले होते आणि या धीरयोंवर लाखो रुपयांची पैजही लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com