Usgao: 'मुख्‍याध्‍यापकांची बदली रद्द करा, अन्‍यथा वर्गावर बहिष्‍कार'! उसगाव येथील विद्यार्थी, पालकांचा इशारा; 8 दिवसांची दिली मुदत

Dhavshire Usgao principal news: धावशिरे-उसगाव येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूरज नाईक यांची बदली रद्द करावी यासाठी पालक एकवटले आहेत.
Dhavshire Usgao school principal
Dhavshire Usgao school principalDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : धावशिरे-उसगाव येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूरज नाईक यांची बदली रद्द करावी यासाठी पालक एकवटले आहेत. त्‍यासाठी त्‍यांनी सरकारला आठ दिवसाची मुदत दिली आहे. या कालावधीत बदली रद्द केली नाही तर १२ नोव्हेंबरपासून विद्यार्थी वर्गावर बहिष्कार घालतील, असा इशारा पालकांनी दिला आहे.

मुख्याध्यापक सूरज नाईक यांनी अडीच वर्षांपूर्वी हायस्कूलचा ताबा घेतला. त्‍यांच्‍या काळात विद्यालयाने प्रगती साधली आहे. शिवाय गेल्या १३ वर्षांपासून दहावीच्या परीक्षेत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.

Dhavshire Usgao school principal
Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

आता सुट्टीच्या दिवशी मुख्‍याध्‍यापकांच्‍या बदलीचा आदेश संबंधित खात्याने काढला असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी पालकांनी हायस्कूलच्या आवारात पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास सतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक नाईक याची बदली रद्द करण्याचा ठराव घेतला. तर, शिक्षणाधिकारी शैलेश झिंगडे व मुख्यमंत्र्यांना भेटून ही बदली रद्द करण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचे उल्हास सतरकर यांनी सांगितले.

Dhavshire Usgao school principal
Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

मुख्याध्यापक सूरज नाईक यांच्या विनंतीनुसारच त्यांची बदली सदर-फोंडा येथे करण्‍यात आलेली आहे. ते धावशिरे हायस्‍कूलमध्‍येच थांबण्‍यास तयार आहेत का, हे पालकांनी त्‍यांना विचारावे. बर्वे या शिक्षिकेला बढती मिळाली आहे.

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com