Dhargal Ayurveda Institute
Dhargal Ayurveda InstituteDainik Gomantak

Dhargal: धारगळच्या आयुर्वेद संस्थेची सेवा, शिक्षण, संशोधन क्षेत्रात झेप; 5.25 लाखांहून अधिक रुग्णसेवा, 40 हजार आरोग्य शिबिरे

Dhargal Ayurveda Institute: धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) चार वर्षांच्या कालावधीत सेवा, शिक्षण आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
Published on

पेडणे: धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) चार वर्षांच्या कालावधीत सेवा, शिक्षण आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असे डीन डॉ. सुजाता कदम यांनी संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात सांगितले.

स्थापनेपासून आतापर्यंत ५.२५ लाखांहून अधिक बाह्यरुग्ण आणि ३१ हजारांहून अधिक आंतररुग्णांनी वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला आहे. तसेच ७७,२०० पंचकर्म प्रक्रिया आणि १,३५,००० रेडिओलॉजी व प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या असून सर्व रुग्णांना विनामूल्य आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात, अशी माहितीही डीन डॉ. सुजाता कदम यांनी दिली.

Dhargal Ayurveda Institute
Goa TET 2025: शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत 'विवाहबाह्य संबंधांवर' उतारा, परीक्षार्थी संतप्त; समाज माध्यमांवर उठली टीकेची झोड

यावेळी ‘एआयआयए’चे संचालक प्रा. पी.के. प्रजापती, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक चाकोर आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल उपक्रमांतर्गत २३३ विदेशी रुग्णांनी ओपीडी तर १६ रुग्णांनी आयपीडी सेवांचा लाभ घेतला. संस्थेने आतापर्यंत ४०,४०० आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत.

सध्या चार पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ग १०० विद्यार्थ्यांची क्षमता असून नव्या ओपीडी, दंत ओपीडी, कार्यचिकित्सा, कौमारभृत्य आणि विस्तारित पंचकर्म थिएटर्समुळे सार्वजनिक आरोग्यसेवा आणखी बळकट झाल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

Dhargal Ayurveda Institute
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

‘एनएबीएच’ मान्यता

दररोज ८०० हून अधिक रुग्ण ओपीडीला भेट देत असून संस्थेला मिळालेली ‘एनएबीएच’ मान्यता हा अभिमानाचा टप्पा असल्याचे संचालक प्रा. पी. के. प्रजापती यांनी नमूद केले.

आयुष आधारित वेलनेस टुरिझम, ‘सीएसआयआर-एनआयओ’, तसेच ‘बिट्‌स-पिलानी गोवा कॅम्पस’ यांच्यासह संशोधन व शैक्षणिक सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचे उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com