जांबावलीत तब्‍बल 16 किलो सोन्याची शिबिका तयार करण्यात आली

गोव्‍याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचाही समावेश होता. या उत्‍सवाला जणू गुलालोत्‍सवाचे स्‍वरूप प्राप्‍त झाले होते.
Goa

Goa

Dainik Gomantak

Published on: 
Updated on: 

केपे : जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर संस्थानात आणलेल्या सुवर्ण शिबिकेचा समर्पण सोहळा सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी गोकर्ण पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌ विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या हस्ते पार पडला. तब्‍बल 16 किलो सोने वापरून तयार करण्यात आलेली ही शिबिका पाहाण्यासाठी जांबावलीत हजारो भाविकांची एकच गर्दी उसळली होती. त्‍यात गोव्‍याबरोबरच (Goa) महाराष्‍ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकातील (Karnataka) भाविकांचाही समावेश होता. या उत्‍सवाला जणू गुलालोत्‍सवाचे स्‍वरूप प्राप्‍त झाले होते.

<div class="paragraphs"><p>Goa</p></div>
अरविंद केजरीवाल यांची आज कांपाल येथे जाहीरसभा

दुपारी 2 वाजता स्वामींचे आगमन झाल्यानंतर दर्शन, आशीर्वचन झाले. त्‍यानंतर संध्‍याकाळी 4.30 वाजता सुवर्ण शिबिकेचा समर्पण सोहळा मंत्रघोषात पार पडला. यावेळी श्री दामोदर देवाला सुवर्ण शिबिकेत बसवून श्री रामनाथ देवाच्या भेटीसाठी नेण्‍यात आले. नंतर मंदिराला वळसा घालून पालखीचा समारोप कार्यक्रम झाला. संध्याकाळी 7 वाजता पं. अजित कडकडे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. त्‍यासही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com