Goa Liberation Day: "जे 50 वर्षांत झालं नाही ते 10 वर्षांत करून दाखवलं" मुख्यमंत्र्यांनी मांडले विकसित गोव्याचे चित्र

Cm Pramod Sawant Speech: राज्याचा दिवसेंदिवस विकास व्हावा म्हणून सरकार नेहमीच कार्यरत राहिल
Cm Pramod Sawant Speech:  राज्याचा दिवसेंदिवस विकास व्हावा म्हणून सरकार नेहमीच कार्यरत राहिल
Cm Sawant Liberation Day SpeechDainik Gomantak
Published on
Updated on

Cm Sawant Goa Liberation Day Speech

पणजी: गोवा मुक्तिदिनाच्या निमिताने पणजीत ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केले. १९६१ मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत गोव्याने अनेक बदल पहिले आहेत. गुरुवारी (१९ डिसेंबर) रोजी पणजीत झालेल्या मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या १० वर्षांत भाजप सरकारने गोव्यात घडवून आणलेल्या महत्वाच्या बदलांवर प्रकाश टाकला.

गेल्या ५० वर्षांत गोव्यात जे बदल झाले नाही ते भाजप सरकारने केवळ १० वर्षांत करून दाखवले आहेत आणि केवळ डबल इंजिन सरकारमुळे हे सर्व शक्य झाले असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यातील ग्रामीण भागांमध्ये BSNLची 5G सेवा पोहोचावी म्हणून सरकार कार्यरत आहे, यामुळे दुर्गम भागांमधली कनेक्टिव्हिटी सुधारायला मदत मिळेल.

Cm Pramod Sawant Speech:  राज्याचा दिवसेंदिवस विकास व्हावा म्हणून सरकार नेहमीच कार्यरत राहिल
Goa Liberation Day:...तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले; मुख्यमंत्री सावंत

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी काही सरकारी योजनांवर भर दिला, 'हर घर नल से जल', '१०० टक्के विद्युतीकरण', 'हर ग्राम सडक' आणि 'हर घर शौचालय' यासारख्या महत्वाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचवणारं गोवा हे पाहिलं राज्य ठरल्याचा मला अभिमान आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कुशलतेचे कौतुक केले. राज्याचा दिवसेंदिवस विकास व्हावा म्हणून सरकार नेहमीच कार्यरत राहिल आणि पुढील वर्षापर्यंत १७ हजार लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करत राहू असे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Krishi Pe Charcha
Goa Warkari Tradition History Before Portuguese
Pramod Sawant On Konkan
Goa Temple Tourism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com