

मडगाव: मागील तीन आठवड्यांच्या कालावधीत मडगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय बोर्डा, घोगळ परिसरातही काही डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मडगाव पोलिस ठाणे आणि आसपासच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धूर फवारणी आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मडगाव पोलिस ठाण्यात राज्याच्या विविध भागांतून नागरिक आणि पोलिस कर्मचारी येत असतात. त्यामुळे नेमकी लागण कुठे झाली, हे सांगणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे दक्षतेचे आवाहन
पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठेही पाणी साचून राहणार नाही आणि डासांची पैदास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य खात्याकडून नागरिकांना करण्यात आल्या आहेत. पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनाही आरोग्याची काळजी घेण्याचे तसेच ताप किंवा डेंग्यूसदृश लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.