Goa Rain Update: अवकाळीने उडवली दाणादाण

Goa Rain Update: पणजीत क्रीडाग्राम चिखलमय : दोन ठिकाणी कोसळली वीज; अनेक भागांमध्ये पडझड
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain Update: मंगळवारी रात्री उशिरा ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला दमदार पाऊस बुधवारी पहाटेपर्यंत सुरूच राहिल्याने राज्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. पणजीतील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे क्रीडाग्राम चिखलमय झाले.

Goa Rain Update
हिमालयही असुरक्षित

कारापूर-साखळीत लॉण्ड्रीवर, तर पाळी पंचायत क्षेत्रातील तळेमाथा येथील लक्ष्मण नाईक यांच्या घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील पावसाचा परिणाम दिसून आला. हवामान खात्याने उद्याही (गुरुवारी) राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Goa Rain Update
54th IFFI: ‘नवा रंग नवा साज’

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरही पावसाचा परिणाम दिसून आला. कांपाल येथील क्रीडाग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. क्रीडा स्पर्धेसाठी आणलेले जनरेटर तसेच इतर साहित्य भिजून गेले. मात्र, अवघ्या काही तासांतच पुन्हा व्यवस्थित नियोजन करून स्पर्धा सुरळीतपणे घेण्यात आल्या.

बुधवारी पहाटे पावसाने दाणादाण उडवली असली, तरी सायंकाळी मात्र पावसाने उघडीप दिली. त्यामुळे आकाश निरभ्र होते. मागील २४ तासांत राज्यात सरासरी ५८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. दाबोळीत सर्वाधिक ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारी (ता.८) पहाटे ५ वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील परिणाम दिसून आला. जनजीवनदेखील विस्कळीत झाले. अचानक मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला. क्रीडाग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

शिवोलीत कोसळले झाड

शिवोली-सडयेत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर सडये होलीक्रॉस हायस्कूलला लागून असलेल्या रस्त्याशेजारचे भले मोठे आंब्याचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने या भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घोलान-मार्ना येथील श्‍याम धारगळकर यांच्या राहत्या घरावर झाडाची फांदी तुटून पडल्याने पत्र्यांचे नुकसान झाले.

क्रीडा स्पर्धेसाठी आणण्यात आणलेले जनरेटर्स तसेच इतर साहित्य भिजून गेले; परंतु अवघ्या काही तासांत पुन्हा नियोजन करून स्पर्धा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्या. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आवारात सुरू राहिल्या. गोवा वेधाशाळेद्वारे गुरुवारीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

पेडे क्रीडा संकुल झाले जलमय

म्हापसा येथील पेडे स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला अवकाळी पावसाचा फटका बसला. खेळाडू तसेच इतर प्रतिनिधींसाठी जेवण बनविण्यासाठी उभारलेल्या तंबूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे व्यवस्थापन तसेच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. परिणामी, कर्मचाऱ्यांना या तंबूमधील साहित्य दुसऱ्या तंबूत हलवावे लागले. कालांतराने व्यवस्थापनाने या स्थितीवर नियंत्रण मिळवले. विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे.

क्रीडा स्पर्धांवर परिणाम नाही

पावसामुळे बुधवारी स्पर्धांच्या वेळेत बदल करावा लागला. आज रात्रीपर्यंत बहुतांश स्पर्धा संपुष्टात येतील. केवळ सायकलिंग स्पर्धा बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये पाऊस पडला तरी व्यत्यय येणार नाही; कारण ती आऊटडोअर स्पर्धा आहे. अग्निशमन, साबांखा, वीज खाते यांनी उत्तम कामगिरी बजावल्याने स्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.

काणकोणात भातशेती आडवी

काणकोणात अवकाळी पावसामुळे गुळे, श्रीस्थळ, खोतीगाव व गावडोंगरी येथील भातशेती आडवी झाली. ही भातशेती तयार झाली आहे. मात्र, अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना कापणी करता येत नाही. कापणी करून शेतात ठेवलेले भात पीक पावसाने भिजले, तर काही ठिकाणची भातशेती वाहून गेली, असे दया गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com