Viral Post: 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू'; चोडण येथे 30 व्हिला, यॉट क्लब, हेलिपॅड उभारणार?

Reddit Viral Post On Goa: पैशासाठी गोव्याची विक्री होत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
Viral Post: 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू'; चोडण येथे 30 व्हिला, यॉट क्लब, हेलिपॅड उभारणार?
Reddit Viral PostDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्ली - हरियाणाकरांनो तुमच्या राज्यांसारखी आमच्या गोव्याची देखील वाट नका लावू, अशी एक पोस्ट सध्या रेडीट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होत आहे. चोडण बेटावर 30 व्हिला, यॉट क्लब आणि हेलिपॅड उभारण्याची योजना असल्याचा दावा या पोस्ट मधून करण्यात आला आहे. यावरुन सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

व्हायरल रेडिट पोस्टमधून काय दावा करण्यात आलाय?

रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन गोवा या सबरेडिटमध्ये एका युझरने पोस्ट केली आहे. 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू', या आशयाखाली ही पोस्ट करण्यात आलीय. गुरुग्राम येथे ३२ अव्हेन्यू कंपनी चोडण येथील शेती आणि खाजन भागात 30 व्हिला, यॉट क्लब आणि हेलिपॅड उभारणार आहे, असा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.

Viral Post: 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू'; चोडण येथे 30 व्हिला, यॉट क्लब, हेलिपॅड उभारणार?
Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून, CM विरोधकांच्या टार्गेटवर

खाजन वेटलँड घोषित केले आहेत, तर खारफुटी शेती आणि मासेमारीसाठी उपयोगी आहेत, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून, पैशासाठी गोव्याची विक्री होत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

"धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारात गावच्या पंचायतीने गावकऱ्यांसोबत उभं राहणं आवश्यक होतं पण, पंचायत देखील त्यांनाच पाठिंबा देत आहे", असा दावा एका युझरने या पोस्टवर प्रतिक्रिया देताना केला आहे.

"गोव्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे, डोंगरकापणी केली जातेय, समुद्रकिनाऱ्यांवर सिंमेटची बांधकामे उभारली जात आहेत. झाडांची कत्तल होतेय. पुढील दहा वर्षात गोवा मोठ्या संकटात असेल. लोभामुळे पर्यटन पूरक गोव्याची काय अवस्था झालीय. दरवर्षी आता पूर आल्यास आश्चर्य व्यक्त करु नका", असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे.

Viral Post: 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू'; चोडण येथे 30 व्हिला, यॉट क्लब, हेलिपॅड उभारणार?
Viral Video: खासदार कॅप्टन विरियातोंना राहुल गांधीनी दिलं Birthday Surprise; प्रियंका गांधींचीही हजेरी

दरम्यान, अशा विकास प्रकल्पात संबंधित कंपनीचा काय दोष? खरा दोष आपल्या पंचायती आणि राज्य सरकारमध्ये आहे. ही लोकंच अशा प्रकल्पांना परवानगी देतात, असे मत आणखी एकाने व्यक्त केले आहे.

काही नेटकऱ्यांनी याबाबत स्थानिक राजकारणी लोकांना जाब विचारायला हवा असे मत व्यक्त केले. तर, मुंबई भकास झालीय, पुणे अखेरच्या घटका मोजतेय आता गोव्याचा नंबर आहे. आपल्या डोळ्यासमोर विद्रुपणीकरण सुरु आहे पण आपण काहीच करु शकत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

भूतानी वरुन झाला होता वाद

गेल्यावर्षी सांकवाळ येथील भूतानी इन्फ्राच्या प्रकल्पावरुन देखील मोठा वाद झाला होता. प्रकल्पाला परवानगी देण्यावरुन नागरिकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. भूतानाची परवानगी रद्द होत नाही तोपर्यंत शांत न बसण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली होती. दरम्यान, आता चोडण येथील प्रकल्पामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com