Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून, CM विरोधकांच्या टार्गेटवर

Goa Vidhansabha Hivali Adhivshan 2025: केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याने विरोधकांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून, CM विरोधकांच्या टार्गेटवर
Goa Assembly Winter Session 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Legislative Assembly Winter Session 2025

पणजी: गोवा विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन गुरुवारी ०५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. केवळ दोनच दिवस घेतलेल्या अधिवेशनात प्रत्यक्ष एकच दिवस कामकाज होणार असल्याने विरोधकांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच, ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केलाय.

गोव्यात कॅश फॉर जॉब स्कॅम, जमीन रुपांतर घोटाळा, गुन्हे, सुलेमान खान उर्फ सिद्दीकी फरार प्रकरण, कला अकादमी नुतनीकरण, म्हादईचा मुद्दा यासारख्या विषयावरुन राज्य सरकार वादात सापडले असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावरुन भाजप सरकारवर टीका केलीय. सरकारने प्रत्यक्ष एकच दिवसाचे अधिवेशन घेऊन लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला.

Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून, CM विरोधकांच्या टार्गेटवर
Sal River: 'सासष्टी'ची जीवनदायिनी ते गटारगंगा! 'साळ' नदीची दुरवस्था रोखण्यास सरकार अपयशी

०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दुसऱ्या दिवशी नियोजित कामकाज पार पडेल. यात मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या गृह, शिक्षण, अर्थ, बांधकाम, नागरी उड्डाण, कौशल्य विकास, खाण यासह इतर विभागांबाबत प्रश्न विचारण्यात येतील.

यासह इतर खात्यांबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसतील. दरम्यान, एकच दिवस होणाऱ्या अधिवेशनामुळे वेळेच्या बंधनाखाली सत्ताधाऱ्यांना यातून बचावाला जागा देखील मिळणार आहे.

विरोधकांत फूट

विधानसभेत इनमीन सात विरोध असताना त्यात देखील फूट पडल्याचे दिसून येत आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकरांनी ते विरोधी आमदारांचा भाग नसून 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे.

पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मात्र बोरकर विरोधकांचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नक्की कोणाचे खरे याबाबत विरोधक देखील संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून, CM विरोधकांच्या टार्गेटवर
Manual Scavenging: हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेपासून गोवा मुक्त; सरकारतर्फे फळदेसाईंनी केली मोठी घोषणा ..

आपच्या वेंझीनं केलं मुख्यमंत्र्यांचे कौतुक

आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची तुलना भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी केली.

यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. यावरुन गोवा फॉरवर्ड आमदरा विजय सरदेसाई - वेंझी व्हिएगस आणि मुख्यमंत्री सावंत यांच्या कलगीतुरा देखील रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com