Goa Election: गोव्यात मतमोजणीची तयारी सुरू

900 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू; दुपारपर्यंत निकाल अपेक्षित
Goa Election News Updates
Goa Election News UpdatesDainik Gomantak |Goa Election News Updates

पणजी: विधानसभेच्या सर्व चाळीसही मतदारसंघातील 1722 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. यावेळी 78.94 टक्के मतदान झाले असून अंदाजे 26 हजार पोस्टल बॅलेट मतदान अपेक्षित आहे. यासाठी 9 राजकीय पक्षांसह अपक्ष असे 301 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी अवघा आठवडाभर उरला असून आयोगाने दक्षिण गोवा (South Goa) आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मतमोजणीची तयारी जोरात सुरू केली आहे. 10 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Goa Election News Updates)

Goa Election News Updates
प्रतापसिंग राणे यांच्या आजीवन कॅबिनेट दर्जाला ॲड. रॉड्रिग्ज यांचा आक्षेप

राज्यात 10 मार्च रोजी होत असलेल्या मतमोजणीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याकरिता दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी होत आहे. उत्तर गोव्यासाठी (North Goa) 19 मतदारसंघाची मतमोजणी पणजी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे होत असून, दक्षिण गोव्यातील 21 मतदार संघासाठी दामोदर महाविद्यालय, मडगाव येथे मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 900 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

येत्या शनिवारी या संदर्भातील अंतिम बैठक होणार आहे. यावेळी मतदानासाठी पूर्वीच्या 1683 मतदान केंद्रामध्ये भर टाकत 1722 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघात सरासरी 42 मतदान केंद्र असून, एका मतदारसंघासाठी 6 ते 8 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या 6 ते 8 फेऱ्या होतील असे अपेक्षित आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्य नोंदणी अधिकाऱ्यासह मतमोजणी कर्मचारी, सहाय्यक मतमोजणी कर्मचारी, निरीक्षक अधिकारी असा फौजफाटा तैनात असेल.

Goa Election News Updates
Weather Updates: गोवेकरांना उन्हाळ्याची झळ बसणार; हवामान खात्याचा अंदाज

मतदानयंत्रे स्ट्रॉंगरूममध्ये सीलबंद

14 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे पणजी आणि मडगाव येथे स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आली असून, 10 मार्च रोजी ती टप्प्याटप्प्याने मतमोजणी खोल्यांमध्ये नेण्यात येतील. तिथे त्यांची मतांची मोजणी होईल. यावेळी सर्वाधिक मतदान साखळी येथे झाले असून, सर्वात कमी मतदान दक्षिण गोव्यातील बाणावली इथे झाले आहे. यासाठी ३०१ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. सर्वाधिक 13 उमेदवार शिवोली मतदारसंघात आहे. सर्वात कमी उमेदवार डिचोली (Bicholim), पर्वरी, सांताक्रुज, मडगाव, बाणावली या मतदारसंघात प्रत्येकी पाच आहेत. तर साखळी येथे 12 उमेदवार असून येथे सर्वाधिक मतदान झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com