सरकार स्थापनेत दिरंगाई; भाजपच्या दिल्लीवाऱ्या

राहुल म्हांबरे: आम आदमी पक्षाच्या आमदारांचा माशेलात भव्य सत्कार
Goa BJP Government
Goa BJP Government Dainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: निवडणूक निकालाला दहा दिवस झाले, पण गोव्यात अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेले नाही. पंजाबमध्ये आपने सरकार स्थापन केले, विकासकामाला सुरूवात झाली, पण गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री ठरलेला नसल्याने सरकार स्थापण्यात दिरंगाई चालली आहे. फक्त दिल्लीवाऱ्या सुरू आहेत, अशी टीका आपचे संयोजक राहुल महांबरे यांनी माशेल येथे केली.

माशेल येथील नोनू व्हिलेजमध्ये आपच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आयोजित केला होता. व्यासपीठावर बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, वेळ्ळीचे क्रुझ सिल्वा यांच्या गौरवप्रसंगी राहुल म्हांबरे, नोनू नाईक, माजी मंत्री महादेव नाईक, जिल्हा पंचायत सदस्य हेन्झेल फर्नांडिस उपस्थित होते.

Goa BJP Government
शिरोलीत ‘करवली’ उत्सव उत्साहात

म्हांबरे पुढे म्हणाले, राज्यात अनेक कामे ठप्प झाली आहेत. रस्ता, पाणी, वीजेच्या समस्या आहेत. सत्ता स्थापन करण्यापेक्षा चाय पिया, समोसा खाया याचाच बोलबोला भाजपचे आमदार करीत आहेत. त्यांना सामान्य जनतेबद्दल काहीच वाटत नाही.

सत्काराला उत्तर देताना वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा म्हणाले, आम आदमी पक्षाची ही सुरुवात आहे. सर्वसमान्यांचा विकास करणे हेच आपले ध्येय असून दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास घडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.महादेव नाईक म्हणाले, पक्षाचे दोन आमदार विधानसभेत दाखल झालेत. तेव्हा भविष्यात आपचे बहुमताचे सरकार येण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न करावे. संपूर्ण गोव्यातील जनतेसाठी या दोन्ही आमदारांनी कार्य करावे.

Goa BJP Government
सतीश धोंड हेच भाजपच्या यशाचे शिल्पकार

यावेळी आपचे विविध मतदारसंघातील विधानसभा निवडणुक लढविलेले उमेदवार उपस्थित होते. प्रा. रामराव वाघ, राजेश कळंगुटकर, गोरखनाथ यांनी ओळख करून दिली. रुपेश मावळिंगकर यांनी सूत्रसंचालन केले. नोनू नाईक यांनी प्रास्ताविक केले. मनोजकुमार घाडी यांनी आभार मानले.

शिरोड्यात सत्कार करणार

शिरोडा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या दोन्ही आमदारांचा भव्य सत्कार लवकर करण्यात येणार आहे. शिरोड्यातील आपच्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. कारण ह दोन्ही आमदार गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे महादेव नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com