सतीश धोंड हेच भाजपच्या यशाचे शिल्पकार

राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचा निष्कर्ष : ‘सोशल इंजिनीयरिंग’चा प्रभावी वापर
Satish Dhond News, Goa BJP News
Satish Dhond News, Goa BJP NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: प्रतिकूल परिस्‍थितीतही गोव्‍यात भाजपने 20 जागा जिंकल्या. त्यासाठी रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) केलेली मतफोडी कारणीभूत असल्याचा दावा काही स्‍थानिक प्रसारमाध्यमे करत असताना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मात्र यशाचे पूर्ण श्रेय भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांना व त्यांनी केलेल्या ‘सोशल इंजिनीयरिंग’ दिले आहे.(Satish Dhond News)

‘द हिंदू’ या राष्ट्रीय वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात गोव्यात भाजपने मिळविलेल्‍या घवघवीत यशाचे शिल्‍पकार सतीश धोंड यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनाही श्रेय दिले आहे. मराठा व भंडारी या समाजाची मते पक्षाकडे वळविण्याचे कसब त्यांनी करून दाखविल्याने हे यश प्राप्त झाले आहे.

Satish Dhond News, Goa BJP News
शिरोलीत ‘करवली’ उत्सव उत्साहात

माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर असताना सारस्वत समाज भाजपच्या मागे खंबीरपणे उभा होता. मात्र त्यांच्या निधनानंतर हा समाज भाजपपासून दूर गेला असताना प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनवून तसेच सदानंद शेट तानावडे यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लावून मराठा समाजाची मते भाजपकडे वळविली. तसेच भंडारी समाजाच्‍या नेत्‍यांना जवळ करून या समाजाची मतेही भाजपकडे वळतील हे पाहिले. भाजपच्या आताच्या यशात हेच ‘सामाजिक इंजिनीयरिंग’ महत्वाचे ठरले आहे, असे वृत्तात म्‍हटले

आहे. आपला मुद्दा स्पष्ट करताना ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने गोव्यातील एका ज्येष्ठ भाजप नेत्याचा हवाला दिला आहे. या नेत्याच्या मते, काँग्रेसची मते ‘आप’ व तृणमूल या दोन पक्षांत विभागून जाण्यापेक्षा मराठा आणि भंडारी समाजाची मते भाजपकडे आल्‍यामुळे त्‍या पक्षाला हे यश मिळाले.

Satish Dhond News, Goa BJP News
‘आप’ बनेल गोव्यातील सामान्‍य जनतेचा आवाज

जेव्‍हा पर्रीकरांशी ताणले होते संबंध

गोव्यात भाजप पक्ष उभा करण्यात मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याबरोबर सतीश धोंड यांनीही महत्त्‍वपूर्ण भूमिका निभावली होती. पर्रीकर यांच्या विश्वासातील सहकारी म्हणून धोंड याना ओळखले जात असे. मात्र 2012 मध्ये पर्रीकर आणि धोंड यांच्यामधील संबंध ताणले व धोंड यांची रवानगी ठाणे-महाराष्ट्र येथे पक्षाच्या संघटन कार्यासाठी करण्‍यात आली. पर्रीकर यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा गोव्यात आणले गेले. यावेळी भाजपकडे पर्रीकर यांच्‍यासारखा नेता नसल्याने गोव्यात हा पक्ष सत्तेवर येणे कठीण असल्‍याचे बोलले जात होते. परंतु सतीश धोंड आणि प्रमोद सावंत यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com