Goa Theft Case: सांतिनेझ येथे फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी

4 लाखांचे दागिने लंपास; नागरिकांत घबराट
Goa Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft Case: तांबडीमाती - सांतिनेझ येथील मधुबन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज दिवसाढवळ्या चोरांनी दाराचे लॅच (लॉक) तोडून सुमारे ४ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटधारक प्रशांत वेरेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Goa Theft Case
Illegal Goa Mining: बेकायदा चिरेखाणीप्रकरणी खाण संचालकांना कोर्टाचे निर्देश...

या घटनेमुळे या इमारतीतील फ्लॅटधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फ्लॅटधारक वेरेकर हे या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहातात. या इमारतीमधील काही फ्लॅट बंद आहेत. चोरांनी फ्लॅटमधील सुमारे ४ लाखांचे दागिने चोरले.

त्यामध्ये मंगळसूत्र, दोन सोनसाखळ्या तसेच २ अंगठ्यांचा समावेश आहे. गणेश चतुर्थी जवळ आली की अनेकजण बँकेत ठेवलेले दागिने घरी आणतात. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडण्याची अधिक शक्यता असते. लोकांनी किमती वस्तू, दागिने ठेवून फ्लॅट वा घर बंद करून बाहेर जाऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक पालेकर यांनी केले आहे.

अवघ्या दीड तासात मारला डल्ला

वेरेकर यांची मुले सकाळी शाळेत निघून गेली, तर पत्नी कामानिमित्त बाहेर पडली. वेरेकर सकाळी १० च्या सुमारास फ्लॅटचे लॅच बंद करून मार्केटमध्ये गेले. ११.३० च्या सुमारास ते घरी परतले असता, फ्लॅटचे दार उघडे होते म्हणून त्यांनी आतमध्ये पाहिले असता,

चोरी झाल्याचे दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाच्या दारांची कुलुपे तोडून सोन्याचे दागिने लंपास केले होते. अवघ्या दीड तासांत चोरांनी डल्ला मारला, यावरून ही टोळीच असण्याची शक्यता तक्रारदाराने व्यक्त केली.

Goa Theft Case
School Hijab Row: ‘त्या’ विद्यार्थिनींना हिजाबाची कुणीही सक्‍ती केली नव्‍हती!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com