Illegal Goa Mining: बेकायदा चिरेखाणीप्रकरणी खाण संचालकांना कोर्टाचे निर्देश...

नुकसान भरपाई वसुली अहवाल द्या!
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Goa Mining: बेकायदा चिरेखाणी उत्खननप्रकरणी खाण खात्याने 23 जणांविरुद्ध नुकसान भरपाई वसुली तसेच फौजदारी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील काहीजणांनी या आदेशाला आव्हान दिले आहे, तर काहीजणांनी गुन्हा मान्य केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

Goa Mining
Mapusa Municipality: म्हापशात कचरा टाकणाऱ्या 45 जणांवर दंडात्मक कारवाई करीत; 1 लाखाचा दंड वसूल

त्यामुळे खाण खात्याने आतापर्यंतचा नुकसान भरपाई वसुलीचा अहवाल सादर करावा. ज्यांनी आव्हान दिले आहे, त्यावरील सुनावणी खाण सचिवांनी तीन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देश देत गोवा खंडपीठाने पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला ठेवली आहे.

बुधो गावकर यांनी उच्च न्यायालयात एका बेकायदा चिरेखाण उत्खननप्रकरणी याचिका सादर केली होती. त्यावेळी खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत सरकारला राज्यातील अशा सर्व बेकायदा चिरेखाणींसंदर्भात सर्वे करून कारवाईचे निर्देश दिले होते.

नुकसानीपेक्षा दंड नगण्य

खाण खात्याने नुकसान भरपाईसाठी प्रमाणपत्र देऊन वसुली सुरू केली होती. त्यातील काहींनी या प्रमाणपत्राला आव्हान दिले आहेत. काहींनी गुन्हा मान्‍य करून दंडात्मक रक्कम भरली. मात्र, दंडापोटी वसूल केलेली रक्कम झालेल्या नुकसानीच्या तुलनेत कमी असल्याने गोवा खंडपीठाने असमाधान व्यक्त केले आहे.

दस्तावेजही मागवला

काही प्रकरणांत संशयितांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन त्या प्रकरणांचा दस्तावेज संबंधित न्यायालयाकडून येत्या 15 दिवसांत न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी मागवून घ्यावा आणि तो एकसदस्यीय खंडपीठासमोर तपासणीसाठी ठेवावा, असे गोवा खंडपीठाने स्पष्ट केले.

Goa Mining
School Hijab Row: ‘त्या’ विद्यार्थिनींना हिजाबाची कुणीही सक्‍ती केली नव्‍हती!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com