खांडेपारमध्ये बालभवनचा गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

मुलांच्या आवडीनिवडी ओळखा
Children's demonstration program in Khandepar in excitement
Children's demonstration program in Khandepar in excitementGomantak Digital Team

पाळी : लहानपणातच मुलांच्या आवडीनिवडी ओळखा आणि त्यांना योग्य आकार द्या, असे आवाहन बालभवनचे संचालक दयानंद चावडीकर यांनी केले. खांडेपार येथे बालभवनतर्फे आयोजित गुणदर्शन या कार्यक्रमात चावडीकर बोलत होते. हा कार्यक्रम एमआयबीके विद्यालयाच्या सभागृहात काल झाला.

यावेळी व्यासपीठावर एमआयबीके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शबनम आगा, पत्रकार नरेंद्र तारी, सम्राट क्लब खांडेपारचे अध्यक्ष मनोहर शेटकर तसेच बालभनवचे खांडेपार केंद्र प्रमुख कमलाकांत गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

Children's demonstration program in Khandepar in excitement
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

दयानंद चावडीकर म्हणाले की, मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिकू द्या. आपण त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये. बालभवनच्या माध्यमातून संगीत तसेच इतर विविध उपक्रम शिकवले जात आहेत. मुलांना योग्य प्रोत्साहन मिळावे, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी बालभवन कार्यरत आहे.

सरकारकडून बालभवनद्वारे मुलांच्या कलागुणांना वाव करून देण्यासाठी अनेक उपक्रम साकारले जात असून अशा उपक्रमांत मुलांनी सहभागी व्हायला हवे. खांडेपार बालभवनचे कार्य खूप चांगले असून या केंद्रात मुलांची वाढत असलेली संख्या समाधानकारक असल्याचेही दयानंद चावडीकर यांनी सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.

Children's demonstration program in Khandepar in excitement
Goa News : पारवाड-साट्रे रस्ता, पुलाचे काम रखडले

शबनम आगा यांनी बालभवन केंद्र खांडेपार येथे सुरू केल्यामुळे येथील मुलांना सोयिस्कर ठरले असल्याचे नमूद केले. बालभवनच्या विविध उपक्रमांमुळे मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यास मदतच होत असल्याने एमआयबीके विद्यालयातर्फे अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Children's demonstration program in Khandepar in excitement
Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

नरेंद्र तारी तसेच मनोहर शेटकर यांनीही बालभवनच्या मुलांचे कौतुक करून मुलांना योग्य प्रशिक्षण द्या, उद्याचे सक्षम कलाकार आजच्या मुलांमध्येच आहे, त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिकू द्या, असे आवाहन केले. पं. कमलाकांत गावस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुलांनीच यावेळी सूत्रसंचालन केले. मुलांनी सुरेख स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती.

Children's demonstration program in Khandepar in excitement
Goa News : मंदिराकडे जाणारी पायवाट अडविल्‍याने भाविक संतप्‍त

मुलांकडून सुरेख सादरीकरण...

बालभवन मुलांनी खांडेपार येथे आयोजित या गुणदर्शन कार्यक्रमात सुरेख पेशकश केली. नृत्य, वादन तसेच इतर कलाप्रकारातही मुलांनी उत्कृष्ट पेशकश केल्याने उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. लोकनृत्याचा सुरेख कलाप्रकार मुलांनी सादर केला.

त्याचबरोबर तबला, संवादिनी एकलवादन आणि पारंपरिक भजनाचा प्रकारही या मुलांनी सादर केला. या मुलांना बालभवनच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले होते. विशेषतः प्राथमिक व माध्यमिक वर्गातील मुलांनी सुरेख कलाविष्कार सादर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com