Gram Sabhas
Gram SabhasGomantak Digital Team

Goa News : मंदिराकडे जाणारी पायवाट अडविल्‍याने भाविक संतप्‍त

झुवारीनगर येथील प्रकार; सांकवाळ ग्रामसभा गुंडाळली
Published on

सांकवाळ पंचायत क्षेत्रातील झरीत-झुवारीनगर येथे गेल्‍या 70 वर्षांपासून श्री रेणुका यल्लमा देवीचे मंदिर आहे. भाविक नित्यनेमाने तेथे पूजाअर्चा करतात. सदर परिसरातील जमीन मोहिद्दीन नामक बिल्डराने झुआरी कंपनीकडून विकत घेऊन घेऊन तेथे संरक्षक भिंत उभारली. त्‍यामुळे मंदिराकडे जाणारी पारंपरिक वाट बंद झाली. या प्रकारामुळे देवीचे भक्त संतप्त बनले आहेत.

हा विषय आज ते ग्रामसभेत उपस्थित करणार होते. पण तो योग येऊच दिला नाही. कारण ग्रामसभा अर्धवट सोडून देण्यात आली. त्‍यामुळे ग्रामस्‍थांनी तीव्र नाराजी व्‍यक्त केली. याबाबत बोलताना माजी पंच शिवानंद भिंगी यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही मंदिराकडे जाणारी पारंपरिक वाट बंद करू देणार नाही. सांकवाळ पंचायत व संबंधित खात्यांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करावी.

Gram Sabhas
Goa Fest : पुरुमेंताच्या फेस्ताकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

पंचायतीने पैशासाठी जमीन विकल्‍याचा सनसनाटी आरोप

सदर जमीन सुमारे 50 हजार चौरस मीटर असून ती बिल्डर मोहिद्दीन यांनी झुआरी कंपनीकडून विकत घेऊन विकसित केली आहे. त्यातील सुमारे साडेबारा हजार चौरस मीटर जमीन ‘खुली जमीन’ म्‍हणून सांकवाळ पंचायतीने आपल्‍या ताब्यात घ्‍यायला पाहिजे होती.

Gram Sabhas
Goa Congress: राजीव गांधींचे राष्ट्र, गोव्यासाठीचे योगदान युवकांनी जाणून घ्यावे

तसे न करता पैशांच्या लालसेपोटी ती बिल्डराला विकून टाकल्‍याचा आरोप पंच तुळशीदास नाईक यांनी केला. शिवाय सांकवाळ पंचायतीने बिल्डराला भूखंड करून रस्ते करण्यासाठी मान्यता दिली. त्‍यामुळे बांधकाम तसेच मुख्य प्रवेशद्वार बेकायदेशीर आहे. त्‍यासाठी कोणतीच परवानगी बिल्डराला दिलेली नाही. त्‍यामुळे मंदिराकडे जाणारी पारंपरिक वाट अडवून त्‍याने आपली मनमानी करू नये, असा सल्लाही त्‍यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com