Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

Betalbatim Elderly Abuse Case: बेताळभाटी येथील ८५ वर्षीय वृद्धाचा त्याच्याच मुलगा आणि सुनेकडून छळ झाल्याची घटना समोर आल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Betalbatim Elderly Abuse Case
Goa Elder AbuseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बेताळभाटी येथील ८५ वर्षीय वृद्धाचा त्याच्याच मुलगा आणि सुनेकडून छळ झाल्याची घटना समोर आल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वृद्धाच्या लंडनस्थित मुलीने आपल्या वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा आणि सुनेला त्यांच्या मालकीच्या घरातून एका महिन्याच्या आत बाहेर काढण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

काँग्रेस नेत्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो आणि दक्षिण गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते लिंकन गोम्स यांनी शुक्रवारी कोलवा पोलिस ठाण्यात जाऊन उपनिरीक्षक प्रशांत भगत यांची भेट घेतली. हाऊन्स्लो (ब्रिटन) येथे वास्तव्यास असलेल्या मारिया डिसोझा यांच्या वतीने त्यांनी ही मागणी केली.

Betalbatim Elderly Abuse Case
Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

मारिया यांच्या वडिलांचे, लॉयोला डिसोझा यांच्या मालकीच्या घरातून त्यांचा मुलगा इसिदोर डिसोझा आणि सून थेरेजा गोन्साल्विस यांना एका महिन्याच्या आत बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. लॉयोला डिसोझा यांना घरात मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोलवा पोलिसांनी गुन्ह्याची दखल घेत इसिदोर डिसोझा याला ताब्यात घेतले होते.

त्यानंतर त्याला उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. वैयक्तिक बाँडवर त्याची सुटका करण्यात आली असून, यापुढे वडिलांचा छळ करणार नाही, अशी लेखी हमी त्याच्याकडून घेण्यात आली आहे.

Betalbatim Elderly Abuse Case
World Elder Abuse Awareness Day : जागृती अहवाल जाहीर; राज्यात 55 टक्के ज्येष्ठांवर होतो अत्याचार

वृद्ध नातेवाईकाच्या स्वाधीन

कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या विनंतीवरून वृद्ध लॉयोला डिसोझा यांना शुक्रवारी रात्री एका नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, हे घर वृद्ध लॉयोला डिसोझा यांच्या मालकीचे असल्याने त्यांनी स्वतःच्या घरातच राहावे आणि मुलीने नियुक्त केलेल्या केअरटेकरमार्फत त्यांची देखभाल करण्यात यावी, अशीही मागणी काँग्रेस नेत्यांनी पोलिसांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Fish Market Drainage Issue
Son returns home after 30 years
Betalbatim Elderly Father Assault
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com