

पणजी: राज्यात गेल्या पाच वर्षांत पर्यटक आणि स्थानिक मिळून ९६ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे. तर, या काळात दृष्टीच्या जीवरक्षकांना २,६५४ जणांना वाचवण्यात यश मिळाल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे का? सध्या किती जीवरक्षक कार्यरत आहेत? पाच वर्षांत समुद्रात बुडून किती जणांचा मृत्यू झाला?
किती जणांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले? पाच वर्षांच्या काळात दृष्टी कंपनीवर किती खर्च करण्यात आला? त्यावरील उत्तरात राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या ४५३ जीवरक्षक कार्यरत आहेत.
पर्यटन खात्याने राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर ११६ ठिकाणे जलतरण क्षेत्रे (पोहण्यास मुभा) म्हणून अधिसूचित केलेली आहेत. यापैकी एकाही क्षेत्रावर पर्यटक किंवा स्थानिकाचा बुडून मृत्यू होण्याची घटना घडलेली नाही, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी उत्तरात म्हटले आहे.
वर्ष वाचले मृत्यू
२०२१ ६२५ ५
२०२२ ४६१ १६
२०२३ ४६७ ३३
२०२४ ६३९ २५
२०२५ ४६२ १७
(नोव्हेंबरपर्यंत)
एकूण २,६५४ ९६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.