Datta Naik Madgao Complaint
Datta Damodar Naik Dainik Gomantak

Datta Naik: दत्ता नाईक यांच्या अडचणी वाढल्या!! धार्मिक भावना दुखावल्याने दुसरी तक्रार मडगावमधून..

Police Complaint Against Datta Naik: काणकोणनंतर आता मडगावमधून देखील दत्त नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे
Published on

मडगाव: पर्तगाळ मठ आणि भट-पुरोहित वर्गा विषयी भाष्य केल्याप्रकरणी उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात शनिवारी (दि. ४ जानेवारी ) पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती. धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य नायक यांनी एका टीव्हीच्या खासगी मुलाखतीत केले होते. काणकोणनंतर आता मडगावमधून देखील दत्ता नायक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होतेय तसेच धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याच्या आरोपाखाली दत्ता दामोदर नायक यांच्या विरुद्ध काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

Datta Naik Madgao Complaint
Datta Naik: दत्ता नायक पुरावा देऊ शकतील का? 'सोशल मीडिया'वर जोरदार चर्चा

एकूण घडलेल्या प्रकारात, नायक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले होते आणि यावेळीच त्यांनी धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य केले होते.

काय म्हणाले होते दत्ता दामोदर नाईक?

"मी मुळात सेक्युलर विचाराचा आहे. हिंदुत्ववाद, भाजप, आरएसएस हे मला मान्य नाही. ख्रिश्चन, मुस्लिमांचा द्वेष करुन हा देश खड्यात जाईल. मी देवळात दान करत नाही. मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात", असे वक्तव्य नायक यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com