Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

Damu Naik Temple Cake Cutting Controversy: भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरवळे-साखळी येथील श्री देव रूद्रेश्वर मंदिरात केक कापण्यात आल्याने विरोधक आक्रमक झालेत.
Damu Naik Temple Cake Cutting Controversy
Damu Naik Temple Cake Cutting ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरवळे-साखळी येथील श्री देव रूद्रेश्वर मंदिरात केक कापण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस व आप पक्षातील नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी टीका करताना म्हटलं की, "मंदिर हे वाढदिवस साजरा करण्यासाठी नाहीत, तर धार्मिक विधींसाठी आहेत. गोव्याच्या परंपरांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी."

भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म'असल्याची टीका काँग्रेसनं केलीय.

Damu Naik Temple Cake Cutting Controversy
Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

तर दुसरीकडे, आप पक्षाचे नेते अमित पालेकर यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त केलीय. "देव रूद्रेश्वर हे भंडारी समाजाचे आराध्य दैवत आहे. अशा वाढदिवसाच्या पार्ट्यांसाठी मंदिरात केक कापणे योग्य नाही. हे समाजाच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणारे आहे." असं अमित पालेकर म्हणालेत.

२७ जागा जिंकण्याचा आमचा निर्धार

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या लक्ष्याबाबत भाष्य केले. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ५१ टक्के मतदान मिळवून २७ जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी नवीन- जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्य करणार आहोत.

पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होऊन गोव्याच्या जनतेचे कल्याण व्हावे, यासाठी श्री देव रूद्रेश्वर चरणी प्रार्थना केली आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

Damu Naik Temple Cake Cutting Controversy
Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

दामू यांच्या वाढदिवसानिमित्त देव रूद्रेश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, जयेश साळगावकर, श्याम सातर्डेकर, माजी आमदार किरण कांदोळकर, रूद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, डिचोली तालुका भंडारी समाज अध्यक्ष सुशांत पेडणेकर तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com