मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन

मूळ आडपई येथील पण व्यवसायानिमित्त फातोर्डा येथे स्थाईक झालेले दामोदर आडपईकर हे भंडारी चळवळीतील नेते होते.
मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन

मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: मडगावचे प्रसिद्ध व्यापारी आणि भंडारी समाज चळवळीतील नेते दामोदर नामदेव आडपईकर (Damodar Adpaikar) (71) यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले. आजच त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन</p></div>
व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग,पश्चिम गोव्याच्या पहिल्या भेटीवर..!

काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मडगावात एका खासगी इस्पितळात भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी दीप्ती, पुत्र दिपराज व दीपकुमार तसेच अन्य परिवार आहे.

<div class="paragraphs"><p>मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन</p></div>
काँग्रेसला चिंतनाची आवश्यकता

मूळ आडपई येथील पण व्यवसायानिमित्त फातोर्डा येथे स्थाईक झालेले आडपईकर हे भंडारी चळवळीतील नेते होते. मडगाव बाजारात त्यांचे दुकान असून मडगावच्या सामाजिक कार्यातही त्यांच्या सक्रिय सहभाग होता. मडगाव शिगमोत्सव उत्सवाचे ते संस्थापक सदस्य होते. मडगाव बाजारकर मंडळाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. एक चांगले हौशी नाट्य कलाकार म्हणूनही त्यांना ओळखले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com