Dak Adalat Goa: मनीऑर्डर, बचत खाते आणि टपालाच्या रखडलेल्या समस्या सुटणार, पणजीत डाक अदालत; कधी होणार? कसा अर्ज करायचा? वाचा

Post Office Panaji Goa: विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
postal complaints Goa
Dak Adalat Panaji,Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोस्ट मास्तर जनरल, गोवा विभाग पणजी व्दारे 61 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल रखडलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. नागरिकांना यासाठी तक्रारीचा अर्ज सादर करावा लागणार आहे. पोस्टाने याबाबत माहिती दिली आहे.

दि. 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 61 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.

postal complaints Goa
BCCI Womens Cricket: रोमहर्षक लढतीत गोव्याची जम्मू-काश्मीरवर मात! उस्माची अष्टपैलू खेळी, शतकी खेळीसह पटकावल्या 3 विकेट

गोवा विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल.

विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.)

postal complaints Goa
Sattari: नोकरभरतीत ‘मराठी’चा समावेश करा! सत्तरी तालुका मराठीप्रेमींची मागणी; राजभाषा संचालकांना निवेदन

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1 पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 12 मार्च 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, असे पोस्टाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com