BCCI Womens Cricket: रोमहर्षक लढतीत गोव्याची जम्मू-काश्मीरवर मात! उस्माची अष्टपैलू खेळी, शतकी खेळीसह पटकावल्या 3 विकेट

BCCI Womens Cricket U23 Tournament: गोव्यातर्फे उस्मा हिने तीन, पूजा यादव हिने १० षटकांत १८ धावांत २ गडी बाद करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
Goa Vs Jammu Kashmir Womens Cricket Match
Usma Khan GoaDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Womens Cricket Goa Vs Jammu Kashmir

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला क्रिकेट स्पर्धेतील पहिले वैयक्तिक शतक नोंदविलेल्या उस्मा खान (१०० धावा व ३-३७) हिचे शानदार अष्टपैलुत्व मंगळवारी गोव्यासाठी निर्णायक ठरले. त्यामुळे महिलांच्या २३ वर्षांखालील एकदिवसीय करंडक स्पर्धेतील रोमहर्षक लढतीत जम्मू-काश्मीरला पाच धावांनी नमविणे शक्य झाले.

स्पर्धेच्या ब गटातील सामना केरळमधील तिरुवनंतपुरम्‌ येथे झाला. मिझोरामविरुद्ध स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ७१ धावांची खेळी केलेल्या उस्मा हिने जम्मू-काश्मीरविरुद्ध जिगरबाज शतक केले.

तिने गोव्याला ५ बाद ६८ या कठीण स्थितीतून सावरताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २०३ धावांची मजल गाठून दिली. उस्मा हिने १५३ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. तिने मेताली गवंडर (२८) हिच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ५४ धावांची, तर साक्षी गावडे (१३) हिच्यासह सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.

Goa Vs Jammu Kashmir Womens Cricket Match
Womens Cricket Tournament: गोव्याच्या महिलांची दणदणीत सलामी! कर्णधार पूर्वाची अष्टपैलू कामगिरी; मिझोरमचा दारुण पराभव

उत्तरादाखल जम्मू-काश्मीरला निर्धारित ५० षटकांत ७ बाद १९८ धावा करता आल्या. त्यांच्यातर्फे चिवट झुंज देताना चित्रा सिंग जामवाल हिने नाबाद शतक (नाबाद १०१, ११६ चेंडू, १२ चौकार, १ षटकार) झळकावले; पण ती अखेरच्या षटकात संघासाठी विजयी कामगिरी बजावू शकली नाही. गोव्यातर्फे उस्मा हिने तीन, पूजा यादव हिने १० षटकांत १८ धावांत २ गडी बाद करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. गोव्याचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.

Goa Vs Jammu Kashmir Womens Cricket Match
U23 Cricket Tournament: गोव्याच्या पोरी हरल्या! 23 वर्षांखालील वनडे स्पर्धेत कर्नाटकने नोंदवला विजय

संक्षिप्त धावफलक : गोवा : ५० षटकांत ९ बाद २०३ (हर्षिता यादव ४, कुशी बांदेकर ७, उस्मा खान १००, पूर्वा भाईडकर १, हर्षदा कदम ७, ऊर्वशी गोवेकर ८, मेताली गवंडर २८, साक्षी गावडे १३, पूजा यादव ३, सेजल सातार्डेकर नाबाद २, भारती सावंत नाबाद १, मरिया नूरैन २-३३, रोनाक जहाँ २-२५, रुद्राक्षी चिब २-४९) वि. वि. जम्मू-काश्मीर : ५० षटकांत ७ बाद १९८ (बनवदीप कौर २३, चित्रा सिंग जामवाल नाबाद १०१, रुद्राक्षी चिब २२, सेजल सातार्डेकर ७-०-३९-०, पूर्वा भाईडकर १०-२-४०-१, उस्मा खान ८-०-३७-३, भारती सावंत १०-१-४०-०, मेताली गवंडर २-०-१०-०, पूजा यादव १०-०-१८-२, साक्षी गावडे ३-०-१४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com