Sattari: नोकरभरतीत ‘मराठी’चा समावेश करा! सत्तरी तालुका मराठीप्रेमींची मागणी; राजभाषा संचालकांना निवेदन

Marathi in Goa government Job Recruitment: सत्तरी तालुका मराठीप्रेमी संघटनेतर्फे वाळपई येथील शिष्टमंडळाने गोवा राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रशांत शिरोडकर यांना निवेदन सादर केले.
Sattari Taluka Marathipremi Sanghatana
Sattari Taluka Marathipremi SanghatanaDainik Gomantak
Published on
Updated on

Marathi language movement in Goa

पणजी: गोव्यातील मराठीप्रेमींनी राज्य सरकारच्या नोकरभरती प्रक्रियेत मराठी भाषेचा समावेश करावा, तसेच सर्व सरकारी कार्यालयांचे फलक मराठीतून लावण्याची मागणी केली आहे. सत्तरी तालुका मराठीप्रेमी संघटनेतर्फे वाळपई येथील शिष्टमंडळाने गोवा राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रशांत शिरोडकर यांची निवेदन सादर केले.

या मागण्यांवर शिरोडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मराठीतून फलक लावण्यात येणार येतील, असे आश्‍वासन दिले. तसेच सरकारी अर्जही मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती ॲड. शिवाजी देसाई यांनी दिली.

Sattari Taluka Marathipremi Sanghatana
Gomantak Marathi Academy: "मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायलाच हवा", गोमन्तक मराठी अकादमी उभारणार लढा

सरकारी फलक मराठीतून हवेत

मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी हे निवेदन थेट गोवा सरकारी नोकर भरती आयोगापर्यंत पोचवले जाणार आहे. तसेच मराठी नामफलकासाठीही मराठीप्रेमींनी सरकारकडे सातत्याने यासंबंधी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी डॉ. अनुजा जोशी, प्रकाश भगत, दशरथ मांद्रेकर, विश्वेश प्रभू, माधव सटवाणी, बाबली कांदोळकर, विजय नाईक, चंद्रकांत गावस, तुळसीदास काणेकर, संदीप केळकर, गणपतराव राणे, रोशन देसाई उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com