Sharad Ponkshe Goa: 'राम, कृष्ण आणि छत्रपतींच्या गोष्टी मुलांना शिकवा'! पालक व मुले विषयावर शरद पोंक्षे यांचे सडेतोड भाष्य

Sharad Ponkshe Goa Speech: रामाने प्रेमासाठी सेतूची निर्मिती केली तो सेतू वानरांनी बांधल्यासारखे हिनवले, परंतु आपल्यादेखी हा ‘रामसेतू’च खरे प्रेमाचे प्रतिक असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.
Sharad Ponkshe Goa
Sharad PonksheDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंग्रजी येत नाही त्याची आपणाला लाज वाटत नाही. पण संस्कृत येत नाही त्याचे काहीच वाटत नाही. एनसीआरटीने अकबर व बाबर यांचे खरे रूप पहिल्यांदा पाठ्यपुस्तकात आणले. त्यामुळे मागील ७८ वर्षानंतर ते आम्हाला समजले. त्यामुळे पालकांनी मुलांवर प्राचीन संस्कृतीचे संस्कार करणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानच्यावतीने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागाझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते ‘पालक आणि मुले’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे आनंद वाचासुंदर, श्रेया वाचासुंदर, दिलीप बेतकेकर व इतरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

११० वर्षे मुस्लिमांची भारतात सत्ता राहिली पण त्यांना हा देश मुस्लिम देश बनवता आला नाही. अनेक राजांनी ते होऊ दिले नाही, परंतु ही इस्लामी आक्रमणे थोपवणाऱ्या राजांची गोष्ट मुलांना माहीत नाही, हे वास्तव आहे. पुढील पिढीसाठी राम, कृष्ण आणि छत्रपती शिवरायांच्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत, असेही पोंक्षे म्हणाले.

Sharad Ponkshe Goa
Marathi Language: 'मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देणारच'! फोंड्यात निर्धार; मातृशक्ती समित्यांची होणार निवड

प्रेमाचे प्रतिक ‘रामसेतू’

देशात सुरुवातीपासून आपणास ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक असल्याचे सांगितले जाते, परंतु त्या ताजमहलच्या खालच्या १३ खोल्या उघडल्या जात नाहीत. कारण त्यातून काही सत्य बाहेर येऊ शकते. परंतु एका मुलाने शाळेत दिलेले उत्तर आपणास भावते.

Sharad Ponkshe Goa
Marathi Schools Goa: सरकारी मराठी शाळा बंद पाडण्यासाठी पालक नव्‍हे, सरकार जबाबदार नाही का? वेलिंगकरांचा सवाल

कारण एका शाळेतील मुलांनी प्रेमाचे प्रतिक म्हणून ताजमहल असे उत्तर दिले, पण दुसऱ्या मुलाने प्रेमाचे प्रतिक हे ‘रामसेतू’ असल्याचे सांगितले. त्यावरून रामाने प्रेमासाठी सेतूची निर्मिती केली तो सेतू वानरांनी बांधल्यासारखे हिनवले, परंतु आपल्यादेखी हा ‘रामसेतू’च खरे प्रेमाचे प्रतिक असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com