गोव्यात घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांची महागला

महिलांच्या बजेटला पुन्हा कात्री; सिलिंडर दराची हजार रुपयांकडे वाटचाल
Gas Cylinder
Gas CylinderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्‍यांचे जगणे कठीण बनले आहे. त्यातच आज पुन्‍हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरचा दर भडकला. प्रतिसिलिंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे हा दर आता 999.50 प्रतिसिलिंडर झाला आहे. ही वाढ आज, शनिवार 7 मेपासून लागू करण्यात आली आहे.

Gas Cylinder
'फुर्तादो हॉटेल पाडण्याचा लाखोंचा खर्च मालकाकडूनच वसूल करावा'

पणजीत 14.2 किलोग्रॅम घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. मागील वेळी 22 मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली होती. एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रतिसिलिंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. शिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या किमती लागू झाल्यानंतर राज्यात 1 मेपासून 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमती 2253 रुपयांवरून 2355.50 रुपये झाले आहेत.

Gas Cylinder
बनावट नोटांच्या रॅकेटमधील सर्व आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

दरम्यान मिसेस मुख्यमंत्री तथा भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुलक्षणा सावंत यांनी या विषयावर भाष्य केले आहे. वाढलेले सिलिंडरचे दर हे केवळ गोव्यात नसून हा जागतिक आर्थिक उलाढालींचा परिणाम आहे. थोडे दिवस आपल्याला ही वाढ सहन करावी लागले. रशिया-युुक्रेन युद्धामुळे गॅसचे दर वाढले आहेत. यावर सरकार लवकरच उपाय योजेल, अशी आशा आहे, असेही त्या म्हणाल्या.

दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसारखे घरगुती गॅस सिलिंडरचे दरही आता नियमित स्वरूपात वाढत आहेत. याला जागतिक कारणे सांगितली जातात. मात्र, सामान्य नागरिकांचा विचार कोणच करत नाही. इतर अनेक योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण जीवनावश्‍यक गॅस सिलिंडरची दरवाढ मात्र रोखली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस गृहिणींचे घर खर्चाचे बजेट कोलमडत आहे, अशी भावना सर्वसामान्य महिलांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com