Goa Crime: म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश! 1 कोटी 27 लाखांची फसवणूक उघड; दोघे अटकेत

Cyber Crime Case: शहर सायबर गुन्हे शाखेने संघटित सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करत ‘म्युल अकाउंट’ (ऑनलाईन फसवणुकीत वापरले जाणारे बँंक खाते) रॅकेटचा पर्दाफाश केला.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: शहर सायबर गुन्हे शाखेने संघटित सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करत ‘म्युल अकाउंट’ (ऑनलाईन फसवणुकीत वापरले जाणारे बँंक खाते) रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात सुमारे एक कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून दोन प्रमुख संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

तक्रारदार मानसी चव्हाण यांना मेघा मारदोळकर (रा. चन्नम्मानगर, बेळगाव) हिने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी तसेच सरकारी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

Cyber Crime
व्हॉट्सॲप कॉल अन् CBI ची धमकी! 90.85 लाख उकळणारा केरळचा 21 वर्षीय भामटा जेरबंद; गोवा पोलिसांकडून 'डिजिटल अरेस्ट'चा पर्दाफाश

त्यानुसार तक्रारदार आणि हरिश्चंद्र अविनाश दिवटे यांच्या नावाने दोन बँकेत खाती उघडण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी किंवा कर्ज न देता या खात्यांचा वापर ऑनलाईन फसवणुकीच्या व्यवहारांसाठी करण्यात आला.

Cyber Crime
Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

पोर्टलवर १४४ तक्रारींची नोंद

या प्रकरणातील ७२ खात्यांपैकी ४७ खात्यांविरोधात १९३० हेल्पलाईन व राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (एनसीसीआरपी) एकूण १४४ तक्रारी नोंद झाल्या आहेत. खात्यांद्वारे एक कोटी २७ लाख ४ हजार ६७८ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com