Curchorem Sexual Assault Case: लज्जास्पद कबुलीनंतर आता बेकायदेशीर अटकेचा ठपका, क्राईम ब्रँचची मोठी नाचक्की; कुडचडे वासनाकांडातील सोहमला मिळणार जामीन?

Soham Naik Bail Application: भर कोर्टात ‘सोहमला अटक करण्याची गरज नाही’, अशी लज्जास्पद कबुली द्यावी लागलेले क्राईम ब्रँच पोलिस पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Soham Naik Bail Application
Soham Naik Bail ApplicationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कुडचडे वासनाकांड प्रकरणातील संशयित सोहम नाईक प्रकरण हाताळताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने भर कोर्टात ‘सोहमला अटक करण्याची गरज नाही’, अशी लज्जास्पद कबुली द्यावी लागलेले क्राईम ब्रँच पोलिस पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कुठल्याही संशयिताला अटक करताना त्याला त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असतानाही या प्रकरणात तपास करणाऱ्या क्राईम ब्रँच पोलिसांनी ही खबरदारी घेतली नसल्याचे आता पुन्हा एकदा कोर्टातच उघड झाले आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या सोहमने बाल न्यायिक मंडळासमोर जामिनासाठी अर्ज केला असून आज या अर्जाची सुनावणी न्यायिक मंडळाच्या अध्यक्ष न्या. सुनीता गावणेकर यांच्यासमोर आली असता, ही बाब उघड झाली.

Soham Naik Bail Application
Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

या जामीन अर्जावरील दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्या. गावणेकर यांनी १९ मेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली. आतापर्यंत सोहम नाईक याच्या विरोधात एकूण पाच गुन्हे नोंद झाले असून त्यातील सध्याच्या प्रकरणातील गुन्हा सोहमने तो अल्पवयीन असताना केल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी बाल न्यायिक मंडळासमोर सुरू राहणार आहे.

Soham Naik Bail Application
Goa Crime: लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत बरगड्या मोडल्या, कुचेलीत बारमधील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट; सुभाष नाईक यांचा खून

अन् तपास अधिकारी निरूत्तर

सोहमचे वकील अमेय प्रभुदेसाई यांनी दावा केला, की माझ्या अशिलाला अटक करण्यापूर्वी त्याच्या विरोधात नेमके काय गुन्हे आहेत, याचा तपशील लेखी स्वरूपात दिला नाही. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर आहे. यावर तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयाने खुलासा मागितला असता, पोलिस उपनिरीक्षक देईकर यांनी आम्ही सोहमला अटक केली नव्हती, तर त्याला ताब्यात घेतले होते, असे सांगितले. तसे असल्यास त्याला न्यायालयीन कोठडीतून पोलिस कोठडीत घेताना ट्रान्स्फर वॉरंट का घेतले, असा सवाल केला असता तपास अधिकारी निरूत्तर झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com