Curchorem News: हस्तक्षेप याचिका दाखल करणार; कुडचडे पालिकेचा निर्णय

मंत्री नीलेश काब्राल यांचाही पाठिंबा
Goa News | Garbage
Goa News | GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

Curchorem-Cacora Municipal Council: सोनसड्यावरील वीस टन कचरा काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या निर्णयाविरुद्ध हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा निर्णय आज झालेल्या कुडचडे काकोडा पालिकेची बैठकीत घेण्यात आला.

उच्च न्यायालयाला आपली बाजू पटवून देण्यासाठी खटल्यात आपलीही बाजू ऐकून घ्यावी यासाठी ही याचिका दाखल करणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगितले.

३० रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. त्याचे तीव्र पडसाद कुडचडेत उमटल्याने कुडचडे काकोडा पालिकेने खास बैठक आयोजित करून या प्रकल्पात फक्त सांगे, केपे, कोणकोण व धारबंदोडा या चार तालुक्यातील कचराच घेणार असून राज्यातील आणखी कुठल्याही तालुक्यातील कचरा या ठिकाणी घेणार नसल्याचा ठराव घेण्यात आला.

Goa News | Garbage
GBSHSE: गोवा बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी 14 वेगवेगळे व्यावसायिक वर्ग

उच्च न्यायालयाच्या आपली बाजू पटवून देण्यासाठी पालिका हस्तक्षेप याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगितले.

३० ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सोनसड्यावरील २० टन कचरा रोज काकोडा येथील कचरा प्रकल्पात नेण्याचा आदेश दिला होता. या आदेशामुळे कुडचडेतील लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती व हा कचरा काकोडा येथे घेऊ नये असे सांगितले होते.

लोकांच्या प्रतिक्रिया पाहून नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी पालिका मंडळाची खास बैठक बोलावली होती. यावेळी नगरसेवकांबरोबर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल उपस्थित होते. त्यांनीही पालिका मंडळाच्या ठरावाला आपली संमती देऊन आपण लोकांबरोबर असल्याचे सांगितले.

काकोडा येथे शंभर टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया उभारण्यापूर्वी जनसुनावणी झाली होती. त्यावेळी या प्रकल्पात सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा तालुक्यांतील कचरा घेणार असल्याचे सांगितले होते.

आणखी कुठल्याही तालुक्यातील कचरा घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, पण आता न्यायालयाचा सोनसड्या विषयी आदेश आल्याने लोक नाराज आहेत.

Goa News | Garbage
Goa Agriculture: राज्यातील शेती संकटात, शेतकरी चिंतेत; पावसाची प्रतिक्षा

आश्वासन पाळणार : काब्राल

काकोडा येथे उभारण्यात आलेल्या शंभर टन क्षमतेचा प्रकल्प पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून बांधण्यात आला आहे. सध्या कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होऊन अवघे पाच महिने उलटले असून अवघ्या पाच महिन्यात या चार तालुक्यातून शंभर टन कचरा होणे शक्य नाही पण भविष्यात तो होऊ शकतो, असे काब्राल यांनी सांगितले.

चार तालुक्यात तीन पालिका व किमान पस्तीस ग्रामपंचायती असून पालिका प्रमाणे न्यायालयाने पंचायतींना देखील आदेश देऊन कचरा गोळा करण्यावर दबाव टाकला पाहिजे असे सांगितले.

पंचायतींनी कचरा गोळा करण्याविषयी गांभीर्याने काम केल्यास या प्रकल्पासाठी तो पुरेसा ठरणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

कुडचडे मतदारसंघातील लोकांना या प्रकल्पाविषयी दिलेले आश्वासन मी पाळणार असून कुडचडेतील जनतेबरोबर मी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष म्हणतात....

कुडचडे काकोडा पालिका उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असून प्रकल्पासाठी जी जन सुनावणी झाली होती व लोकांनी जे मुद्दे मांडले होते ते न्यायालयासमोर ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू ऐकता हा आदेश दिला, याला आता आव्हान दिले जाईल, असे नाईक यांनी सांगितले. बैठकी उपस्थित सर्व नगरसेवकांनी बाहेरील कचरा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com