GBSHSE: गोवा बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी 14 वेगवेगळे व्यावसायिक वर्ग

विद्यार्थ्यांनी कला जोपासणे गरजेचे : शेट्ये
Class 10 Meritorious students felicitation ceremony
Class 10 Meritorious students felicitation ceremonyDainik Gomantak

शालेय शिक्षणाबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीतकमी एकतरी व्यावसायिक कला जोपसली पाहिजे. जेणेकरून भविष्यात जर शिकून नोकरी मिळाली नाही तर त्या कलेच्या आधारावर आपण स्वतःचे पोट भरू शकू.

ही बाब लक्षात घेऊन गोवा बोर्डाने इयत्ता नववीपासून बारावीपर्यंत १४ वेगवेगळे व्यावसायिक वर्ग सुरू केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोवा बोर्डाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी केले.

Class 10 Meritorious students felicitation ceremony
Janata Darbar Vasco: वास्कोतील दरबारात जनतेऐवजी अधिकारीच!

न्हावेली-साखळी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा समारंभ नुकताच ग्रामपंचायत सभागृहात पार पाडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शेट्ये बोलत होते.

या सोहळ्यास खास निमंत्रित म्हणून वेदांताचे अधिकारी सुसांता गांगुली, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव दीपेश गावस, न्हावेलीचे सरपंच कालिदास गावस, विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गावस, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा नाईक, ज्येष्ठ शिक्षक कृष्णा गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

Class 10 Meritorious students felicitation ceremony
Goa Murder Case: माडेल खूनप्रकरणी पोलिस घेणार लूकआऊट नोटीसची मदत

स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

मुलांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कशी तयारी करावी, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि पुढील वाटचालीसाठी कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात तसेच कौशल्य शिक्षणावर भर देऊन विविध कौशल्ये आत्मसात करावीत, यावर शेट्ये यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

यावेळी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवलेल्या सिद्धांत गावस, युवराज गावस, निधी गावस व इतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

तसेच विद्यालयच्या उत्तम निकालात योगदान दिलेल्या शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्गाचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com