Aguada: 'खराब हवामानात बोट खोल समुद्रात गेलीच कशी'? आग्वाद क्रूझ घटनेची गंभीर दखल; बंदर कप्तान खाते करणार कडक कारवाई

Aguada Cruize Boat Incident: इंजिन बंद पडल्याने हवेमुळे आग्वाद किनाऱ्यावरील खडकात गुरुवारी अडकलेल्या क्रूझ बोटीला मिरामारपासून पुढे खोल समुद्रात जाण्यास परवानगी दिलीच कशी?
Aguada Cruize Boat Incident
Aguada Cruize Boat IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंजिन बंद पडल्याने हवेमुळे आग्वाद किनाऱ्यावरील खडकात गुरुवारी अडकलेल्या क्रूझ बोटीला मिरामारपासून पुढे खोल समुद्रात जाण्यास परवानगी दिलीच कशी? खराब हवामान असल्याची सूचना मिळूनही बोट मालकाने पर्यटकांच्या जिवाशी खेळ केल्याचे स्पष्ट दिसते?

असे प्रश्न उपस्थित होत असल्याने बंदर कप्तान खाते आणि पर्यटन खात्याने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन ऑक्टिवो फर्नांडिस यांनी संबंधित बोट मालकावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ‘गोमन्तक''ला दिली.

फर्नांडिस यांनी सांगितले की, पर्यटक सेवा देणाऱ्या खासगी क्रूझ बोट मालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे, या ग्रुपवर दररोज हवामान खात्याकडून सर्वांना सूचित केले जाते. गुरुवारीही या ग्रुपवर खराब हवामानाचा संदेश देण्यात आला.

Aguada Cruize Boat Incident
Aguada Fort: पोर्तुगीज साम्राज्याचं रक्षण करणारा 'आग्वाद किल्ला', गोव्याच्या इतिहासाचा साक्षीदार

तरीही पर्यटकांना खराब हवामान असतानाही खोल समुद्रात जाणे नियमाचे उल्लंघन ठरते. मिरामारपर्यंत क्रूझ बोट मांडवी नदीतून विहार करू शकते, परंतु समुद्रात जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Aguada Cruize Boat Incident
Aguada Fort: शिवरायांची बार्देश स्वारी, फ्रेंच आक्रमण, मुक्ती संग्रामातील क्रांतिवीर; शेकडो वर्षांचा इतिहास जपणारा 'आग्वाद किल्ला'

३८ पर्यटकांना जीवरक्षकांनी काढले बाहेर

दरम्यान, आग्वाद येथील खाडीजवळ खडकाळ भागात अडकलेल्या क्रूझ बोटीतील ३८ पर्यटकांना आणि एका डिंगी बोटीतील चार जणांना दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी गुरुवारी रात्री यशस्वीरीत्या बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fort Aguada
Ladakh student drowned in goa river accident
Karwar Fishing Boat Sinks Goa
New Casino Vessel Permission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com