Akshata Chhatre
गोव्यातील प्रसिद्ध आग्वाद किल्ला मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. येथील तटबंदी शत्रूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी खास दगडी भिंतींनी बनवली आहे.
सुमारे तीनशे वर्षांपूर्वी, १७व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी हा अभेद्य किल्ला बांधला. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याच्या प्रदेशाचे शत्रूंपासून रक्षण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
येथील तटबंदी शत्रूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी खास दगडी भिंतींनी बनवली आहे.
या किल्ल्यातील १९ व्या शतकात बांधलेला दीपगृह हे एक खास आकर्षण आहे, जे जहाजांना सुरक्षितपणे बंदरात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करत असे.
किल्ल्याच्या आतमध्ये जमिनीखाली पाणी साठवण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी आणि जलकुंड आजही पर्यटकांना आकर्षित करतात.
आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे. येथून अरबी समुद्र आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
पोर्तुगीज आकर्षण आणि भारतीय निर्मिती यांचा अनोखा संगम असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.