Goa Vaccination: लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी परप्रांतीय मजूरांची तोबा गर्दी

सांकवाळ (Sankval) येथील आयुषमान भारत आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये लसीकरणाच्या दुसरा डोस घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी.
Crowds of people taking the second dose of vaccination in Sankval
Crowds of people taking the second dose of vaccination in SankvalDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी- सांकवाळ (Sankval) येथील आयुषमान भारत आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये लसीकरणाच्या दुसरा डोस घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी. जास्त परप्रांतीय मजूर लोकांची उपस्थिती. गोवा राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेण्यासाठी लोकांनी पूर्ण सहकार्य दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याआधीच सूतोवाच दिले आहे. राज्यात दुसरा डोस लसीकरण पूर्ण करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे.

त्यालाही मोठा प्रतिसाद लाभत आहे. सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एखाद्याने डोस घ्यावा की नाही हा त्याचा प्रश्न आहे. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी याआधीच जाहीर केले आहे. राज्यात शंभर टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचाही त्यांनी दावा केला आहे.

Crowds of people taking the second dose of vaccination in Sankval
Goa: गुटख्याची तस्करी करणारा एजंट अखेर गजाआड

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस शुक्रवारी देशभरात कोरोना प्रतिबंधक लोकोत्सवाने साजरा करण्यात आला. देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरणाने वेग घेतला होता. दिवसभर राबविणत आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल सव्वा दोन कोटीहून अधिक जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला.

दरम्यान सांकवाळ येथील आयुषमान भारत आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटर मध्ये रविवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आज रविवारी तोबा गर्दी होती. यात जास्त करून परप्रांतीय मजूर लोकांचा भरणा होता. येथे जवळच असलेल्या वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट व इतर ठिकाणी कामा धंद्यासाठी आलेले परप्रांतीय मजूर लोक सांकवाळ, कुठाळी भागात भाडेपट्टीवर रहात असून त्यांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये डोस घेण्यासाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. तसेच गणेश चतुर्थी काळात सुट्टी असल्याने केंद्र बंद होते. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यावर कामाचा भार अधिकच वाढलेला दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa journalists vs Gautam Khattar
Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths
Sanatan Dharma Insult Demand For Arrest
Biological Mother Intervention Plea Rejected
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com