मडगाव: गोवा मुक्तीचा हीरकमहोत्सव (60th Goa Loberation Day) साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा काल पणजीत (Panaji) कार्यक्रम झाला. मात्र, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. हा सरकारी कार्यक्रम नव्हता, तर सरकारी पैशांनी केलेला भाजपचा (BJP) कार्यक्रम होता असा आरोप विरोधकांनी केला आहे.
या कार्यक्रमाचे आमंत्रण विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना होते. मात्र, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी प्रत्येक बूथ पातळीवरील भाजप नेत्यांना टार्गेट दिले होते. या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी सरकारी पैशांनी प्रत्येक मतदारसंघातून बसगाड्यांची सोय केली होती.
या कार्यक्रमावर गोवा फॉरवर्डचे (Goa Forward party) अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनीही बहिष्कार घातला. हा तर सरकारी पैशांनी साजरा केलेला भाजपचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला जाऊन फायदा काय असा सवाल त्यांनी केला.
हा कार्यक्रम राज्य सरकारचा होताच कुठे, तो भाजपचा कार्यक्रम होता. भाजपच्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला भरभरून नेण्यात आले होते. या अशा कार्यक्रमाला मी कसा जाणार?
- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
ढवळीकरांच्या घरी लग्न
या कार्यक्रमाला मगोचे नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) गैरहजर होते. याबद्दल मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता, आमच्या घरी लग्न समारंभ असल्याने आम्ही त्यात व्यस्त होतो, असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.