Govind Gaude : पुणेकरांनाही भावला मंत्री गावडेंचा ‘संभाजी’; भूमिकेचे कौतुक

बालगंधर्व रंगमंदिरात टाळ्‍यांच्‍या कडकडाटात सत्‍कार; मान्‍यवरांकडून स्‍तुतिसुमनांचा वर्षाव
Goa Minister Govind Gaude
Goa Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Govind Gaude : मराठी भाषा गौरवदिनानिमित्त ‘इथे ओशाळला मृत्यू’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग पुण्‍यातील बालगंधर्व रंगमंदिरात सुरू होता. पहिल्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला हाऊसफुल्ल प्रेक्षागृहाने दाद दिली.

नाटकाच्या मध्यंतराला गोव्याचे कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांचा सत्कार नियोजित होता. त्यासाठी मान्यवर व्यासपीठावर आले आणि सत्कार स्वीकारण्यासाठी चक्क संभाजी महाराजांच्या वेशातील कलाकारच पुढे आला. एका राज्याचे मंत्रीच नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारत होते, हे कळताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.

Goa Minister Govind Gaude
Goa Shigmotsav 2023: पणजीत 11 मार्च रोजी शिगमोत्सव

एखाद्या खात्याचा मंत्री त्याच क्षेत्राविषयी इतका जाणकार आहे आणि त्यात सक्रिय देखील आहे, हे पाहून रसिकांना सुखद धक्का बसला. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही गावडे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमात गोव्याच्या श्री सिद्धिनंदन थिएटरने अवघ्या पंधरा दिवसांच्या तालमीवर हे नाटक सादर केले. मात्र सर्वच कलाकारांची संवादफेक आणि अभिनयातील सफाई यामुळे प्रभावित झालेल्या रसिकांनी त्यांना दाद दिली.

Goa Minister Govind Gaude
LPG Price Hike: झळा महागाईच्या! कमर्शियल अन् घरगुती सिलेंडर झाले महाग

"एखाद्या राज्‍याच्‍या मंत्र्याला नाट्यकलेची एवढी आवड असेल अशी कल्‍पना केली नव्‍हती. गोव्‍याचे कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका कौतुकास्‍पद व दाद देण्‍याजोगीच होती. राजकारणात व्‍यस्‍त असतानाही त्‍यांची कलेप्रती असलेली आत्‍मियता दिसून येते."

- डॉ. मोहन आगाशे, प्रसिद्ध अभिनेते

"कलाकार हा प्रेक्षकांच्या मनात व डोळ्यात भरलेला असतो. तो आपली संपूर्ण ताकद आपल्या कलेतून सादर करीत असतो. मंत्री असताना देखील वेळ काढून रंगमंचावर नाटक उभे करणे सोपे नाही. संभाजी महाराजांचे विचार संपूर्ण श्रद्धेने मंत्री गावडे सादर करतात. रंगभूमीची सेवादेखील त्यांच्या हातून होत आहे."

- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री

"आपल्या भाषेचे, संस्कृतीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचावा, त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने मी हे नाटक करतो. नाट्यकलेवर तसेच मराठी भाषेवर माझे प्रेम आहे. वेळ काढून नाटक केलेच."

- गोविंद गावडे, कला-संस्‍कृतीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com