बेळगावच्या चोरट्यांनी चोरी केले 60 'डुक्कर', डिचोलीत गाडीचा टायर पंक्चर झाला अन्...

बेळगावहून मडगावकडे पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती.
pigs
pigs Dainik Gomantak
Published on
Updated on

एक महिन्यापूर्वी बेळगावच्या चोरट्यांनी तब्बल 60 'डुक्कर' चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बेळगाव येथील चार जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, डिचोली न्यायालयाने संशयितांना जामीन मंजूर केला आहे.

बेळगावहून मडगावकडे पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती.

बेळगावहून मडगावकडे 21 जानेवारी रोजी पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती. कर्नाटक नोंदणीकृत वाहनाचा डिचोली येथे टायर पंक्चर झाल्यामुळे वाहन मोकळ्या जागेत थांबले होते.

2.9 लाख रुपये किमतीची 60 डुकरांची चोरी केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली. चोरलेली डुकरे परत मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान, जनावरे अद्याप सापडलेली नाहीत.

pigs
CM Pramod Sawant: सहा प्रकल्प मंजूर; 310 कोटींची गुंतवणूक, 2,500 युवकांना मिळणार रोजगार संधी

याप्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, आरोपी 24 फेब्रुवारीपासून पोलिस कोठडीत आहेत. जनावरे अद्याप परत मिळाली नसली तरी ती परत मिळवण्यासाठी पोलिसांना संशयितांचा पुरेसा ताबा देण्यात आला होता. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, प्रत्येकी 10,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com