Goa Drugs: गोमंतकीय युवकांना ड्रग्ज विक्रीचा विळखा! शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचली कीड; वाचा धक्कादायक रिपोर्ट

Goa Drugs Human Trafficking: राज्यात २०२४ मध्ये ड्रग्‍ससंदर्भात नोंद झालेल्या १५९ गुन्ह्यांमध्ये १८८ जणांना अटक झाली, त्यामध्ये ५४ जण गोमंतकीय आहेत.
Drugs Case
Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Drug menace in Goa affecting youth and education

पणजी : गोवा हे ड्रग्‍स तस्करीचे विक्रीकेंद्र बनत चालले आहे. येथे मौजमजा करण्यासाठी येणारे पर्यटक सवय म्हणून नव्हे तर मजा म्हणून ड्रग्‍सचे सेवन करतात. त्‍यात देशी पर्यटक मोठ्या संख्‍येने असतात. त्‍यांच्‍याबरोबर गोव्यातील युवापिढीही त्‍यात गुरफटत चालली आहे. कित्‍येक गोमंतकीय युवकांना ड्रग्‍सची विक्री करताना पकडण्‍यात आले आहे.

राज्यात २०२४ मध्ये ड्रग्‍ससंदर्भात नोंद झालेल्या १५९ गुन्ह्यांमध्ये १८८ जणांना अटक झाली, त्यामध्ये ५४ जण गोमंतकीय आहेत. या व्यवसायातील गोमंतकीयांचे हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. झटपट पैसा मिळत असल्‍याने युवापिढी विशेषत: बेरोजगार युवक त्‍यात अडकत चालले आहेत.

गोव्यात बेरोजगार असलेल्‍या तसेच टॅक्सी व हॉटेल व्यवसायात कामाला असलेल्या युवकांना ड्रग्‍समाफियांकडून गलेलठ्ठ पैशांचे आमिष दाखविले जाते. त्‍यांच्‍याशी थेट संपर्क होत असल्याने हे युवकही बळी पडतात आणि ड्रग्‍सविक्री करू लागतात. किनारपट्टी भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्‍यांनाही हे माफिया जाळ्‍यात ओढतात. खाद्यपदार्थ विकण्‍याच्‍या नावाखाली हे विक्रेते नंतर पर्यटकांना ड्रग्‍सची विक्री करतात. त्‍यातून त्‍यांना चांगले पैसे मिळतात.

गेल्या वर्षी ५४ गोमंतकीयांना अटक करण्‍यात आली होती. पण त्यांचे लागेबांधे राजकारण्यांशी असल्याने पोलिसही त्यांच्‍याविरोधात कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्‍यातील बहुतांश बेरोजगार, शॅक्‍समध्ये काम करणारे, टॅक्सीव्यवसायातील किंवा हॉटेलमध्ये रुम मिळवून देणारे दलाल आहेत. या प्रकरणात अटक झाली तरी नंतर जामिनावर सुटका होते, कारण २० किलोपेक्षा कमी गांजा सापडल्यास तो जामीनपात्र गुन्हा ठरतो.

काही विदेशी नागरिक तसेच परप्रांतीय गोव्यात भाडेपट्टीवर बंगले वा फ्लॅट घेऊन ड्रग्‍सव्यवसाय करतात. गोव्यातील मोसमानुसार राज्याबाहेरून ड्रग्‍सचा पुरवठा केला जातो. ही उलाढाल कोट्यवधींच्‍या घरात असली तरी कारवाई मात्र हजारोंच्‍या घरात असते. तसेच हाताच्‍या बोटावर मोजण्‍याइतकेच लोक सापडतात, तेसुद्धा नंतर जामिनावर सुटतात. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे महाविद्यालयातील शिपायांना हाताशी धरून विद्यार्थ्यांना ड्रग्‍स पुरविण्‍याइतपत माफियांची मजल गेली आहे.

जप्‍त केलेल्‍या ड्रग्‍सचा साठा असा केला जातो जप्‍त

जप्त केलेला ड्रग्‍सचा साठा पोलिस तपास होईपर्यंत एका गोदामात ठेवला जातो. आरोपपत्रावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हा ड्रग्‍सचा साठा विल्हेवाटीसाठी काढला जातो. त्यासाठी आवश्‍यक असलेली कायदेशीर प्रक्रिया केली जाते. या ड्रग्‍सची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस, अन्न व औषध प्रशासन, जिल्हाधिकारी व आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमलेली असते.

Drugs Case
Drugs Seized: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 2 कोटीचे ड्रग्स जप्त; दिल्ली पोलिसांकडून दोघा गोमंतकीयांना अटक

शाळेपर्यंत पोहोचली ‘कीड’

ऑगस्ट २०२३ मध्ये डिचोली तालुक्यातील एका विद्यालयात एका विद्यार्थ्याच्या बॅगेत ‘ई-सिगरेट’ सापडली होती. यावरून या नशेची कल्पना करता येते. रात्रीच्या वेळी निर्जन भागात काही युवकांचे गट बसलेले दिसून येतात. ते ड्रग्‍सचे सेवन करतात, असा संशय आहे.

Drugs Case
Goa Crime: कोलवा बीचवर तीन बहिणींची फ्री-स्टाईल मारामारी; झिंज्या उपटल्या, पोलिसांनाही धक्काबुक्की

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२२ मध्ये पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने कारापूर-साखळी येथे एका गॅरेजवर छापा टाकून १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला होता. याप्रकरणी गॅरेज चालविणाऱ्या स्थानिक युवकाला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याखाली गुन्हा नोंद केला होता.

त्यानंतर २०२३च्‍या जुलै महिन्यात कुडचिरे या ग्रामीण भागात पोलिसांनी कारवाई करून एका २१ वर्षीय युवकाला ३७५ ग्रॅम गांजासह अटक केली होती, तर गेल्‍या सप्टेंबर महिन्यात डिचोली बसस्थानक परिसरात एका ३४ वर्षीय युवकाला ९० ग्रॅम गांजासह जेरबंद करण्यात आले होते. या कारवाया सोडल्यास त्यापूर्वीही डिचोली आणि साखळी भागात अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com