
पणजी: गोव्यात सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने बहार आणला आहे. देश विदेशातील सिनेप्रेमींसाठी पर्वणी म्हणावी असा हा उत्सव अनेकांना गोव्याकडे आकर्षित करतोय. यामध्ये यंदाच्या वर्षी प्रामुख्याने नवीन चित्रपट निर्मात्यांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले. क्रिएटिव्ह माईंड ऑफ टुमारो या उपक्रमांतर्गत नवख्या चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाचे प्रशिक्षण देणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपक्रमातील सहभागांनी 48 तासांच्या आत 5 ते 6 मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करणे आवश्यक होते आणि मिळालेल्या माहितीनुसार 100 हून अधिकांनी यात सहभाग घेतला होता.
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो ही स्पर्धा माहिती आणि प्रसारण मंत्रालय, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि शॉर्ट्स टीव्ही यांनी एकत्रपणे आयोजित केली होती.
उपक्रमात सहभागींना नेक्स्ट जनरेशन एआय या विषयावर एक शॉर्ट फिल्म तयार करण्याचा टास्क देण्यात आला होता. ही स्पर्धा बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) पासून सुरु झाली आणि काल म्हणजे शुक्रवार (दि. 22 नोव्हेंबर) पर्यंत चाललेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सहा विभागांमध्ये विभागणी करण्यात आली होती 48 तासांत सिनेमा बनवणं कठीण असलं तरीही यामधून नव निर्मात्यांची क्षमता तपासणं हेच आयोजकांचं प्रमुख ध्येय होतं. आता मुलांनी उपक्रमात बनवलेले शॉर्ट्स टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.