Covid 19: गोव्यात दामोदर भजनी सप्ताह सार्वजनिकरीत्या होणार नाही !

संपूर्ण गोव्यात (Goa) प्रसिद्ध असलेला वास्को (Vasco) येथील श्री दामोदर भजनी सप्ताह कोरोना महामारी (Covid 19) च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रीत्या साजरा होणार नाही.
 Vasco: Executive Committee
Vasco: Executive CommitteeDainik Gomantak
Published on
Updated on

संपूर्ण गोव्यात (Goa) प्रसिद्ध असलेला वास्को (Vasco) येथील श्री दामोदर भजनी सप्ताह कोरोना महामारी (Covid 19) च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रीत्या साजरा होणार नाही. तसेच त्यांना कुठल्याही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नसल्याचा निर्णय श्री दामोदर भजने सप्ताह कार्यकारी समिती आणि उत्सव समितीच्या संयुक्तरीत्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

येथील उद्योजक श्री प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोनाचे सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नसून खबरदारी म्हणून यंदाचा सप्ताह केवळ मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे ठरले. कोरोना महामारीच्या संकटामुळे सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना यंदा बगल देण्यात आलेला आहे. सरकारी नियमाची पायमल्ली होऊ नये यासाठी यंदाची आमसभा सुद्धा घेण्यात आलेली नाही.

 Vasco: Executive Committee
Goa: पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ

श्री दामोदर भजनी सप्ताहाचे हे 122 वे वर्ष असून येत्या 14 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या सप्ताहाला मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून मंदिर परिसरात गर्दी होणार नाही त्याची ही खबरदारी यंदाच्या बैठकीमध्ये घेण्यात आली. सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षी भरणारी फेरी सुद्धा भरू दिली जाणार नाही. मंदिराबाहेर फुले विक्रेत्यांनाही यंदा मज्जाव केला जाणार आहे. मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारचे गर्दी होणार नाही यासाठी समितीतर्फे उपजिल्हाधिकारी, मुरगाव नगरपालिका व वास्को पोलिस स्थानकावर निवेदन दिले जाणार आहे.

 Vasco: Executive Committee
Goa: राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या चर्चेसाठी अयोग्य वेळ- प्रभुदेसाई

सप्ताहाच्या दिवशी मंदिराकडे वेगवेगळ्या भागातून विविध समाजातर्फे येणारे पार यालाही प्रतिबंध करण्यात आले असून त्याऐवजी पार समित्यांना मंदिरा मध्ये येण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. २४ तास अखंडित पणे चालणाऱ्या साखळी भजनाला बगल देण्यात आलेला असून त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने मंदिरामध्ये २४ तास भजन चालू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही श्री दामोदर भजनी सप्ताहाची सुरुवात पारंपारीक गजर तसेच एका अभंगाने करण्यास दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.

 Vasco: Executive Committee
Goa Vaccination: मुंबईहून कोविड लसीचे 17 बॉक्स राज्यात दाखल

यावेळी केंद्रीय समितीचे सचिव विनायक घोंगे, उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, सचिव संतोष खोर्जुवेकर, खजिनदार विष्णू गारोडी तसेच कृष्णा सोनुर्लेकर, दामू कोचरेकर, हेमंत फडते, रघुनाथ खोबरेकर, आत्माराम नार्वेकर, वामन चोडणकर व नरेंद्र गुरव उपस्थित होते. यंदा नवीन उत्सव समितीची निवड न करता जगदीश दुर्भाटकर यांच्या नेतृत्वाखालील दोन वर्षापूर्वीचीच समिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com